गडहिंग्लज पंचायत समितीला हवेत सव्वापाच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST2021-08-21T04:27:47+5:302021-08-21T04:27:47+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समिती इमारतीच्या विस्तारीकरणासाठी ५ कोटी २८ लाखांची गरज आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात ...

गडहिंग्लज पंचायत समितीला हवेत सव्वापाच कोटी
गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समिती इमारतीच्या विस्तारीकरणासाठी ५ कोटी २८ लाखांची गरज आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे.
अलीकडे नव्याने बांधण्यात आलेली प्रशासकीय इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे जुनी इमारत निर्लेखित करून नव्या इमारतीच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव व अंदाजपत्रक सादर करण्याची सूचना सभागृहाने मासिक बैठकीत केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे अभियंता सुकुमार जोशी यांनी हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.
दरम्यान, शुक्रवारी (२०) सभापती रूपाली कांबळे, उपसभापती इंदू नाईक, सदस्य विद्याधर गुरबे, विजयराव पाटील, श्रीया कोणकेरी, बनश्री चौगुले, गटविकास अधिकारी शरद मगर यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती केली. त्याला मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी यावेळी दिले.
-------------------
...अशी असेल विस्तारित इमारत
- तळमजला-पार्किंग
- पहिला मजला-शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व अभिलेख कक्ष.
- दुसरा मजला : सुसज्ज सभागृह.
- एकूण बांधकाम : २० हजार चौरस फूट
- अंदाजे खर्च : ५ कोटी २८ लाख
------------------------
फोटो ओळी :
कागल येथे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना विद्याधर गुरबे यांनी नव्या इमारतीचा प्रस्ताव दिला. यावेळी सभापती रूपाली कांबळे, उपसभापती इंदू नाईक, उपअभियंता सुकुमार जोशी व सदस्य उपस्थित होते.
क्रमांक : २००८२०२१-गड-०६