शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या नगरपालिकेचे कामकाज सौरउर्जेवर चालणार, वर्षाला ६ लाखांची बचत होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:08 IST

जिल्ह्यातील पहिली नगरपालिका

राम मगदूमगडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिका कार्यालयासह वाचनालय, फायर स्टेशन, भाजीमंडई व पॅव्हेलियन इमारतीमधील कामकाज आता सौरऊर्जेवर चालणार आहे. त्यामुळे वर्षाकाठी वीजबिलाच्या ६ लाख रूपयांची बचत होणार आहे. एकाचवेळी ५ इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प राबविणारी गडहिंग्लज ही जिल्ह्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे.नागरिकांना सर्वोत्तम नागरी सुविधा पुरविण्याबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कला, क्रीडाक्षेत्रात विविध उपक्रम राबविणारी एकमेव नगरपालिका म्हणून गडहिंग्लज नगरपालिकेची सर्वदूर ओळख आहे. आयएसओ मानांकन मिळविण्याचा राज्यातील पहिला मानही याच नगरपालिकेचा आहे. स्टेप इलेक्ट्रीसिटी जनरेटरचा प्रकल्पही पालिकेने सुरू केला आहे.नगरपालिका कार्यालय, साने गुरूजी सार्वजनिक मोफत वाचनालय, फायर स्टेशन, भाजी मंडई आणि पॅव्हेलियन इमारतीचे मिळून महिन्याकाठी ५० हजार रूपये वीज बिल येते. त्यामुळे वीज बिलाची बचत व्हावी आणि नगरपालिका इमारतींच्या छताचा उपयोग वीज निर्मितीसाठी व्हावा म्हणूनच सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी घेतला.महाराष्ट्र राज्य सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतंर्गत मिळालेले १६ लाखाच्या अनुदानातून हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. ‘महाऊर्जा’कडून त्याला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. संबंधित इमारतींवर सौरऊर्जा निर्मितीचे पॅनेल्स् बसविण्यात आले आहेत. महिनाभरात हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. याकामी विद्युत अभियंता धनंजय चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.या इमारतींवर प्रकल्पनगरपालिका कार्यालय, साने गुरूजी वाचनालय, फायर स्टेशन इमारत, भाजी मंडई, पॅव्हेलियन

  • प्रकल्पाचा खर्च :  १६ लाख
  • वीज निर्मिती क्षमता : ३१ किलोवॅट
  • वीजनिर्मिती (प्रतिदिनी) : १२० युनीट
  • वीजेची गरज (प्रतिदिनी) : ७० युनीट

अतिरिक्त वीज महावितरण कंपनीला विकण्यात येणार असून त्यातून पालिकेला उत्पन्न मिळणार आहे.

जलतरण तलाव इमारतीसह नगरपालिकेच्या ६ शाळांच्या छतावरही सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प राबविणार आहोत. त्यासाठी सुमारे २० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. त्याचा प्रस्ताव महाऊर्जाकडे मंजुरीसाठी पाठविला असून त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल. - स्वरूप खारगे, प्रशासक तथा मुख्याधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsolar eclipseसूर्यग्रहण