शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Kolhapur: गडहिंग्लज नगरपालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात सलग सहाव्यांदा डंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 12:14 IST

मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत विभागात दुसरी

राम मगदूमगडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ या राष्ट्रीय स्पर्धेत पश्चिम विभागात सलग सहाव्यांदा उज्ज्वल यश मिळविले. त्याचबरोबर मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेतही पुणे विभागात दीड कोटीच्या बक्षिसासह दुसरा क्रमांक पटकाविला. किंबहुना, हे दुहेरी यश म्हणजे शांतता व स्वच्छताप्रिय गडहिंग्लजकरांना नववर्षाची भेटच मानली जात आहे.स्वच्छ सर्व्हेक्षण ही स्पर्धा देशातील पाच विभागात घेतली जाते. त्यापैकी पश्चिम विभागात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गोवा या पाच राज्यांचा समावेश आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच नगरपालिका यशस्वी ठरल्या असून, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ गडहिंग्लज नगरपालिकेचा समावेश आहे. ११ जानेवारीला नवी दिल्लीत या स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.दरम्यान, राज्य शासनातर्फे घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत शहरातील चौक सुशोभीकरण, वारसास्थळांची जपणूक, घराघरांतील विलगीकृत कचरा संकलन, प्लास्टिक बंदी, आर्थिक नियोजन व करवसुली, सार्वजनिक वाचनालय व बगीचा व्यवस्थापन, नावीन्यपूर्ण योजना, सार्वजनिक स्वच्छता व सुविधा, पाणीपुरवठा, मलजल शुद्धिकरण, हरित ब्रँड कंपोस्ट खतनिर्मिती आणि माझी वसुंधरा स्पर्धेतील यशामुळे विभागात दुसरा क्रमांक मिळाला.याकामी प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे, स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता अनिल गंदमवाड, स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे यांच्यासह सर्व खातेप्रमुख, सफाई कामगारांनी विशेष परिश्रम घेतले.

सलग सहाव्यांदा यशस्वच्छ सर्व्हेक्षणात गडहिंग्लज नगरपालिकेने देशाच्या पश्चिम विभागात २०१८ मध्ये ३८ वा, २०१९ मध्ये २४ वा, २०२० मध्ये ६ वा, २०२१ मध्ये ९ वा, २०२२ मध्ये ६ वा क्रमांक पटकाविला. त्याबद्दल आजअखेर तब्बल १२.५० कोटींची बक्षिसे मिळाली आहेत.

९ व १० जानेवारीला मुंबईत ‘मुख्यमंत्री सक्षम शहर’ स्पर्धेतील यशस्वी नगरपालिकांचे सादरीकरण होईल. त्यातून राज्यपातळीवरील क्रमांक मिळाल्यास गडहिंग्लजला ‘मुख्यमंत्री सक्षम शहर’ पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे मार्गदर्शन, शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळेच हे दुहेरी यश मिळाले आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन व आभार. - स्वरूप खारगे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, गडहिंग्लज नगरपरिषद.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर