गडहिंग्लज, कुरुंदवाडचे नगराध्यक्षपद महिलांसाठी खुले
By Admin | Updated: April 14, 2015 01:27 IST2015-04-14T01:27:50+5:302015-04-14T01:27:50+5:30
ओबीसींसाठी ६५, अनुसूचित जातींसाठी ३१ तर अनुसूचित जमातींसाठी १० नगराध्यक्षपदे राखीव

गडहिंग्लज, कुरुंदवाडचे नगराध्यक्षपद महिलांसाठी खुले
मुंबई : राज्यातील विविध नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण नगरविकास विभागाने सोमवारी जाहीर केले.
कोल्हापूर जिल्ह्यात ओबीसी (पन्हाळा), ओबीसी महिलांसाठी (कागल, मुरगूड, मलकापूर), अनुसूचित जाती (इचलकरंजी) अनुसूचित जाती महिलांसाठी (जयसिंगपूर) तर गडहिंग्लज आणि कुरुंदवाडचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे.
राज्यातील ओबीसींसाठी ६५, अनुसूचित जातींसाठी ३१ तर अनुसूचित जमातींसाठी १० नगराध्यक्षपदे राखीव झाली आहेत. खुल्या प्रवर्गातील विदर्भ वगळता इतर नगरपालिकांच्या आरक्षणाची माहिती नगरविकास विभागाने उपलब्ध केलेली नाही.
राज़्यातील आरक्षण असे -ओबीसी : वडगाव कसबा, केज, संगमनेर, कुंडलवाडी, उमरगा, महाड, बार्शी, मंगरुळपीर, गडचिरोली, भोर, नवापूर, चांदूर रेल्वे, भद्रावती, पंढरपूर, गोंदिया, भंडारा, शहादा, दर्यापूर, बारामती, मेहकर, पन्हाळा, गेवराई, जळगाव जामोद, नंदुरबार, चिखलदरा, वरोरा, उदगीर, रावेर, त्र्यंबकेश्वर, काटोल, नांदगाव, विटा.
ओबीसी महिलांसाठी राखीव झाले आहे अशा नगरपालिका - रहिमतपूर, देगलूर, हदगाव, भूम, पवनी, कागल, मुरुम, मुरगुड, किल्ले धारूर, कळंब, म्हसवड, मलकापूर (कोल्हापूर), पैठण, सांगोला, कोपरगाव, कळमुनरी, फलटण, जव्हार, राजापूर, हिंगणघाट, मुदखेड, उरण, पांढरकवडा, खेड, चिखली, आष्टा, बाळापूर, दारव्हा, ब्रह्मपुरी, पुर्णा, बुलडाणा, मंगळवेढा, रामटेक.
अनुसूचित जाती - कन्हान, वाडी, सातारा, वरणगाव, कुळगाव-बदलापूर, अर्धापूर, नेर नबाबपूर, दुधनी, उमरखेड, अंबड, पाचोरा, आळंदी, बसमत, तासगाव आणि इचलकरंजी.
अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राखीव - सिंदी रेल्वे, शेंदुर्जनाघाट, कर्जत, कऱ्हाड, पाथरी, खामगाव, पातूर, नांदुरा, चाळीसगाव, वाई, जयसिंगपूर, महाबळेश्वर, खोपोली, कारंजा, सासवड, मानवत.
अनुसूचित जमाती - अंमळनेर, मौदा, देवळी, भोकर, यावल.
अनुसूचित जमाती (महिला राखीव) - आर्णी, मोवाड, फैजपूर, सिन्नर, राहुरी.
खुल्या प्रवर्ग महिलांसाठी राखीव - मोहपा, मुर्तिजापूर, शिरुर, गडहिंग्लज, औसा, आंबेजोगाई, बीड, वर्धा, मूल, मैंदर्गी, वाशिम, सावनेर, उमरेड, पालघर, मनमाड, अंबरनाथ, पुलगाव, लोणावळा, दिग्रस, नळदुर्ग, शिंदखेडा, मुरुड जंजीरा, महादुला, दापोली, पनवेल, माजलगाव, शिरपूर वरवाडे, गंगापूर, वणी, कुर्डुवाडी, धामणगाव रेल्वे, परांडा, अचलपूर, मोर्शी, सावंतवाडी, श्रीवर्धन, जुन्नर, तिरोडा, पेण, कळमेश्वर, कुरुंदवाड, मुखेड, पाचगणी, मालवण, पाथर्डी, बल्लारपूर, शिर्डी, गुहागर, सोनपेठ, परळी वैजनाथ, चिपळूण, राहता, जिंतूर, उस्मानाबाद, जामनेर, कामठी, इस्लामपूर, मलकापूर (बुलडाणा), अक्कलकोट, अलिबाग, श्रीरामपूर, गडचांदूर, मलकापूर(सातारा), डहाणू, सटाणा, सिन्नर.
विदर्भात खुल्या प्रवर्गासाठी (साधारण) नगराध्यक्षपद आरक्षित झाले आहे अशा नगरपालिकांची नावे - अकोट, तेल्हारा, घाटंजी, पुसद, यवतमाळ. देऊळगाव राजा, शेगाव. (विशेष प्रतिनिधी)