शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज कारखाना कामगारांचे कामबंद आंदोलन अखेर मागे; 'लोकमत'मुळे मिळाले १ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 23:51 IST

थकीत २६ महिन्यांचा पगार,भविष्य निर्वाह निधी,हंगामी कामगारांचे रिटेन्शन अलौऊन्स आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते.

- राम मगदूम

गडहिंग्लज ( कोल्हापूर) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ आणि साखर कामगार संघ यांच्या संयुक्त बैठकीतील सकारात्मक चर्चेतून तोडगा काढण्यात आला. त्यामुळे कामगारांनी २५ व्या दिवशी शनिवारी कामबंद आंदोलन मागे घेतले. हरळी येथे कारखान्याच्या कार्यस्थळी 'स्वाभिमानी'चे राजेंद्र गड्यान्नावर,सर्व संचालक, कामगार संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. थकीत २६ महिन्यांचा पगार,भविष्य निर्वाह निधी,हंगामी कामगारांचे रिटेन्शन अलौऊन्स आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते.

दरम्यान,संचालक मंडळाच्या दोन बैठकीत याप्रश्नी तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला.परंतु, आंदोलनासंदर्भात कारखान्याने औद्योगिक न्यायालयात दाखल केलेला दावा आणि ठोस आश्र्वासनअभावी कामगार आपल्या भूमिकेवर ठाम होते.त्यामुळे चर्चेतून तोडगा काढण्याची सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती. चर्चेत कारखान्यातर्फे अध्यक्ष डॉ.प्रकाश शहापूरकर, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक सतीश पाटील,प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे यांनी तर कामगारांतर्फे  संघटनेचे जनरल सेक्रेटरी अशोक मेंडूले, अध्यक्ष विजय रेडेकर,उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर, भाऊसाहेब पाटील, अरुण शेरेगार, सुनील आरबोळे आदींनी भाग घेतला.

असा काढला तोडगा..!- चालू हंगामापासून पगाराच्या ६० टक्के रक्कम अॅडव्हान्स स्वरूपात, उर्वरित ४० टक्के रक्कम आणि २०२१ पासूनचा थकीत पगार कारखाना नफ्यात आल्यानंतर टप्या- टप्याने देणार- भविष्य निर्वाह निधीची थकीत रक्कम रितसर हप्ते घेऊन भरणार- लवकरच संचालक मंडळ आणि कामगार संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत समझोता करार होणार

'लोकमत'चे मानले आभार..!११ जुलैपासूनच्या कामबंद आंदोलनासंदर्भातील सर्व घडामोडींना ठळक प्रसिद्धी देण्याबरोबरच शेतकरी,कामगार आणि कारखान्याच्या हितासाठी 'लोकमत'ने रोखठोक भूमिका घेतली. त्यामुळे संचालकांना 'मतभेद' बाजूला ठेवून पुन्हा एकत्र यावे लागले. सकारात्मक भूमिकेतून तोडगा काढून थकीत पगारापोटी १ कोटी रुपये खात्यावर जमा केल्यामुळे सर्व कामगारांनी 'लोकमत' विशेष आभार मानले.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूर