गडहिंग्लज विभाग सिंगल बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST2021-07-14T04:29:27+5:302021-07-14T04:29:27+5:30
गडहिंग्लज : ‘ब’ गटात असूनही ज्यांना धान्य मिळत नाही, अशा रेशन कार्डधारकांनी नजीकच्या स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळण्यासाठी अर्ज ...

गडहिंग्लज विभाग सिंगल बातम्या
गडहिंग्लज : ‘ब’ गटात असूनही ज्यांना धान्य मिळत नाही, अशा रेशन कार्डधारकांनी नजीकच्या स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन शिवसेना उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी, तेजस घेवडे यांनी केले आहे. १५ जुलै ते ३० ऑगस्टपर्यंत रेशनकार्ड झेरॉक्स, सर्व सदस्यांचे आधार कार्ड झेरॉक्स, कुटुंबप्रमुख महिलेचा फोटो, मोबाईल क्रमांकासह अर्ज करावेत.
हलकर्णीत केंद्रात शैक्षणिक साहित्य वितरित
गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समितीकडून हलकर्णी, नूल, हिडदुगी या केंद्रांतर्गत शाळांना प्रयोग साहित्य, पृथ्वीचा गोल, वॉटर प्यूरिफायर, क्रीडा व भौगोलिक अभ्यासाचे साहित्य देण्यात आले. हलकर्णी येथे सभापती रूपाली कांबळे, इराप्पा हसुरी यांच्या हस्ते साहित्य वितरित झाले. या वेळी एम. एस. इंगवले, सुरेश हुल्ली, आनंद पाटील, विजय कोळी, इस्माईल कादरभाई आदी उपस्थित होते.
नेसरीनजीक मोरीवर भगदाड
नेसरी : गडहिंग्लज-चंदगड या राज्य मार्गावरील नेसरी पोलीस ठाण्यासमोरील मोरीनजीकच्या रस्त्यालगत जोरदार पावसामुळे भराव खचून भगदाड पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ते त्वरित बुजवावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
कोवाड परिसरात औषधे वाटप
कोवाड : कोवाड (ता. चंदगड) परिसरातील कोवाडसह माणगाव व तुडीये आरोग्य केंद्रांना शिनोळी येथील फेरफिल्ड अॅटलास (देना) कंपनीकडून औषधे मोफत देण्यात आली. या वेळी सरोज हंगीरगेकर, पांडुरंग पाटील, अनंत पाटील, सुरेश उंबळकर, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
इंदू नाईक यांचा सत्कार
गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल इंदू नाईक यांचा हेब्बाळ जलद्याळ येथे नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या कोल्हापूर जिल्हा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे अध्यक्ष गणपतराव पट्टणकुडी, उपाध्यक्ष विनायक नाईक, मारुती नाईक, संजय नाईक, डी. आर. नाईक, शामराव नाईक, बाबूराव नाईक आदी उपस्थित होते.
इंचनाळकरांचे मुश्रीफ यांना निवेदन
गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील अंतर्गत गटर बांधकामासाठी निधी मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या वेळी सरपंच उत्तम कांबळे, प्रकाश पोवार, मारुती कांबळे, गणेश कांबळे, प्रेमचंद्र कांबळे, सूर्यकांत पोवार आदी उपस्थित होते.
ऊर्मिला पाटील यांची निवड
गडहिंग्लज : हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथील सरपंच ऊर्मिला पाटील यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी संजय बटकडली, ज्योत्स्ना पताडे, परमेश्वरी पाटील, ज्ञानप्रकाश रेडेकर, सचिन देसाई, आशिष साखरे, दशरथ कुपेकर आदी उपस्थित होते.