गडहिंग्लज परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:24 IST2021-03-27T04:24:06+5:302021-03-27T04:24:06+5:30
१) भडगावमध्ये अटल रिकरिंग लॅबचे उद्घाटन गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील श्री कल्लेश्वर हायस्कूलमध्ये अटक रिकरिंग लॅबचा ...

गडहिंग्लज परिसर
१) भडगावमध्ये अटल रिकरिंग लॅबचे उद्घाटन
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील श्री कल्लेश्वर हायस्कूलमध्ये अटक रिकरिंग लॅबचा उद्घाटन समारंभ मंगळवारी (दि. ३०) आयोजित केला आहे. आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्याहस्ते लॅबचे उद्घाटन होणार आहे.
--------------------
२) घाळी महाविद्यालयात जल दिन साजरा
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात जागतिक जल दिन पार पडला. ‘सोशल एन्टरप्रेरणशीप स्वच्छता अॅण्ड रूरल एंगेजमेंट सेल’ या शिखर संस्थेच्या मार्गदर्शनानुसार रासेयो, राष्ट्रीय छात्रसेना, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विभागातर्फे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य मंगलकुमार पाटील होते. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
-----------------------
३) उत्तूरला आज कबड्डी स्पर्धा
उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) येथे अंजिंक्यतारा ग्रुपतर्फे उद्या (शनिवारी) सकाळी ९ वाजता ५५ किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. उत्तूर विद्यालय उत्तूर येथे होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना ५००१, ३००१, २००१ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
--------------------------
४) उत्तूरला बुधवारी रस्सीखेच स्पर्धा
उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) येथे अजिंक्यतारा ग्रुपतर्फे बुधवार (दि. ३१) सायंकाळी ५ वाजता सावंत गल्ली येथे ७० किलो वजनी गटातील रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना १११११, ७७७७, ५५५५ अशी अनुक्रमे बक्षिसे देण्यात येणार आहेत.