शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- Gokul politics: डावपेचांचा अंदाज आल्याने गडहिंग्लज-चंदगडकर झाले सावध, शिरोळमध्येही अस्वस्थता

By राजाराम लोंढे | Updated: August 28, 2025 17:45 IST

जिल्हाभर नेटवर्क त्याचाच विजय

राजाराम लोंढेकोल्हापूर : ‘गोकुळ’च्या मागील दोन्ही निवडणुकींतील करवीर, पन्हाळा व कागल तालुक्यांतील राजकीय डावपेचाचा अंदाज गडहिंग्लज विभागातील नेत्यांसह दूध संस्था प्रतिनिधींना आला आहे. त्यामुळे त्यांनी ठरावाची गोळाबेरीज करण्यापासूनच सावध भूमिका घेतली असून काहीही झाले तरी यावेळी मागील पराभवाचा वचपा काढायचाच, या इराद्याने येथील नेत्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचे पडसाद या तालुक्यांच्या संपर्क सभेतून दिसून येत आहेत.‘गोकुळ’च्या मागील निवडणूकीत २१ जागा होत्या. दोन्ही पॅनेलने शिरोळ तालुक्याला उमेदवारी दिली नव्हती. शिरोळला वगळून हातकणंगले तालुक्याला संधी दिली होती. चंदगडमधून तत्कालीन सत्तारुढ गटातून दीपक पाटील, तर विरोधी गटातून सुष्मिता राजेश पाटील रिंगणात होत्या. गडहिंग्लजमधून सत्तारूढ गटातून सदानंद हत्तरकी व प्रकाश चव्हाण, तर विरोधी गटातून महाबळेश्वर चौगुले व विद्याधर गुरबे यांना पॅनेलमध्ये संधी दिली होती.पण, मताच्या साठमारीत सगळेच पराभूत झाले. शिरोळ, गडहिंग्लज, चंदगड हे तालुके मोकळे राहिल्याने गेल्या सव्वाचार वर्षांत दूध संस्था प्रतिनिधीमध्ये काहीशी अवस्थता पाहावयास मिळत आहे. प्रतिनिधी नसल्याने काय नुकसान होते, याची जाणीव झाल्याने गडहिंग्लज विभाग आता एकवटला असून, मागील निवडणुकीत झालेल्या चुका शोधून आगामी निवडणुकीची बांधणी सुरू केली आहे.

जिल्हाभर नेटवर्क त्याचाच विजय‘गोकुळ’च्या निवडणुकीत ज्या उमेदवाराचे संपूर्ण जिल्ह्यात नेटवर्क असते, त्याचा विजय सोपा होतो. ‘गोकुळ’च्या २०१५ च्या निवडणुकीत विरोधी पॅनेलमधून चंद्रकांत बोंद्रे व अंबरीष घाटगे विजयी झाले होते. त्यावेळी, दिलीप पाटील व सदानंद हत्तरकी यांचा पराभव झाला होता. २०२१ च्या निवडणुकीत विरोधी पॅनेलमधून शौमिका महाडिक, बाळासाहेब खाडे, अंबरीष घाटगे, डॉ. चेतन नरके यांनी बाजी मारली. खाडे वगळता महाडिक, घाटगे, नरके हे दिग्गज घरातील उमेदवार होते.

शिरोळमधून रणजीत पाटील यांची चाचपणीमागील निवडणुकीत दोन्ही पॅनेलने शिरोळ तालुक्याला वगळल्याने तेथील नेत्यांनी आतापासूनच जोडण्या लावल्या आहेत. ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांचे सुपुत्र रणजीत पाटील यांनी चाचपणी सुरू केली असून, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी त्यांना ग्रीन सिंग्नल दिल्याचे समजते. महायुतीच्या पॅनेलमध्ये आमदार पाटील-यड्रावकर यांना एक जागा मिळणार हे निश्चित आहे.

मागील निवडणुकीत अशी पडली होती मते..

  • सत्तारूढ - १९३९
  • विरोधी - १६६३