गडहिंग्लजला ईद साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST2021-07-22T04:16:50+5:302021-07-22T04:16:50+5:30
गडहिंग्लज : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘बकरी ईद’ गडहिंग्लज शहर व तालुक्यात साधेपणाने साजरी करण्यात आली. शहरातील सुन्नी जुम्मा ...

गडहिंग्लजला ईद साधेपणाने साजरी
गडहिंग्लज : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘बकरी ईद’ गडहिंग्लज शहर व तालुक्यात साधेपणाने साजरी करण्यात आली. शहरातील सुन्नी जुम्मा मस्जिद, मोहम्मदिया अरबी मदरसा (मर्कज मशीद) व मदिना मस्जिद याठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात ५ लोकांनी नमाज पठण केले.
मौलाना मेहमूद रजा, मौलाना कईम मुल्ला व मौलाना आजिम पटेल यांनी नमाज पठण व खुतबा पठण केले. कोरोना रोगाचे मानवी जीवनातून कायमचे समूळ उच्चाटन व्हावे, लोकांना रोजगार मिळावा, उपासमार संपावी, सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्य निर्माण व्हावे, सर्वत्र शांतता व सुख-समृद्धी नांदावी, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
दरम्यान, गडहिंग्लज शहरासह हलकर्णी, तेरणी, नूल, महागाव, नेसरी, करंबळी, कडगाव, ऐनापूर व गिजवणे येथेही ईद साधेपणाने साजरी करण्यात आली.
जामा मस्जिद येथे प्रत्यक्ष भेट देत पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, कॉ. अनंत देसाई, मारूती ठिकारे, रविकांत शिंदे यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजूभाई खलिफा, प्रा. आशपाक मकानदार, युनूस नाईकवाडे, एम. एस. बोजगर, इर्षाद मकानदार, मंजूर मकानदार, आदी उपस्थित होते.