गडहिंग्लज परिसर निधन बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST2021-05-24T04:22:53+5:302021-05-24T04:22:53+5:30
गडहिंग्लज : शहरातील पुंडलिक शंकर कुंभार (वय ७८) यांचे अकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा मुली, ...

गडहिंग्लज परिसर निधन बातम्या
गडहिंग्लज : शहरातील पुंडलिक शंकर कुंभार (वय ७८) यांचे अकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
* पुंडलिक कुंभार : २३०५२०२१-गड-०२
----------------------
----
२) अनंतराव घोरपडे यांचे निधन
उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) येथील अनंतराव बापूसाहेब घोरपडे (वय ७८ यांचे) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना-नातवंडे असा परिवार आहे. अॅड. बी. बी. घोरपडे यांचे बंधू होत.
* अनंतराव घोरपडे : २३०५२०२१-गड-०३
----
३) विष्णू खराडे यांचे निधन
उत्तूर : वडकशिवाले (ता. आजरा) येथील माजी मुख्याध्यापक विष्णू विठोबा खराडे (वय ६१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
* विष्णू खराडे : २३०५२०२१-गड-०४
----
४) आक्काताई सावंत यांचे निधन
पेरणोली : पेरणोली (ता. आजरा) येथील आक्काताई नारायण सावंत (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना-नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी संघाचे संचालक नारायण सावंत यांच्या त्या पत्नी तर आजरा कारखान्याचे संचालक राजेंद्र सावंत यांच्या त्या आई होत.
* आक्काताई सावंत : २३०५२०२१-गड-०५
-----
५) मारुती बिर्जे यांचे निधन
नूल : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील मारुती राघू बिर्जे (वय ७४ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन, सोमवारी (२४) सकाळी आहे.
* मारूती बिर्जे : २३०५२०२१-गड-०६