शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज सक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:21 IST

सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लज येथे आज रक्तदान शिबिर गडहिंग्लज - जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लज तालुका ...

सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

गडहिंग्लज येथे आज रक्तदान शिबिर

गडहिंग्लज - जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लज तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी (दि. १२) रोजी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत येथील यशवंत बाजारमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय संचालक आणि संकेश्वरच्या हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांनी दिली.

कोरोना महामारीमुळे राज्यभर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी अधिकाधिक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मंत्री पाटील यांना वाढदिवसाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आरबोळे यांनी केले आहे.

बातमी -२ कानोलीच्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू

गडहिंग्लज : कानोली (ता. आजरा) येथील तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा तरुण खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून तो आजारी होता. शुक्रवारी (दि. ७) अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सीपीआरमध्ये हलविण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

------

संकेश्वर आगाराचे ४८ लाखांचे नुकसान

संकेश्वर : दिनांक ७ मार्चपासून कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे संकेश्वर आगाराचे ४ दिवसात ४८ लाखांचे नुकसान झाले आहे. संकेश्वर आगाराकडे ३४६ चालक, वाहक आणि ६३ इतर कर्मचारी आहेत. या सर्वांनी संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे आगाराकडील ११२ बसगाड्यांची चाके थांबली असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. आगारातील ६ प्रशिक्षणार्थींना संपात सहभाग घेता येत नसल्यामुळे त्यांना तत्काळ सेवेत रुजू होण्याचे आदेश नोटीसव्दारे देण्यात आले आहेत.

----