गडहिंग्लजला लालपरीच्या फेऱ्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:02+5:302021-06-09T04:30:02+5:30
गडहिंग्लज : कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून गडहिंग्लज आगाराच्या लालपरीची चाके रस्त्यावर धावली नव्हती. परंतु, लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे पुन्हा त्या चाकांना ...

गडहिंग्लजला लालपरीच्या फेऱ्या सुरू
गडहिंग्लज : कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून गडहिंग्लज आगाराच्या लालपरीची चाके रस्त्यावर धावली नव्हती. परंतु, लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे पुन्हा त्या चाकांना गती मिळाली आहे. त्यामुळे लालपरीच्या फेऱ्या पुन्हा सुरू झाल्या आहेत.
गडहिंग्लज आगाराकडील गडहिंग्लज, कोल्हापूर, आजरा, गारगोटी, नेसरी, हिटणी मार्गावर बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आगारप्रमुख संजय चव्हा यांनी दिली.
गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील बहुसंख्य लोक नोकरी आणि अन्य कामानिमित्त कोल्हापूरला जात असतात. लॉकडाऊनमुळे बससेवा बंद होती. अनेकांची त्यामुळे कामे खोळंबली आहेत. बससेवा पूर्ववत सुरू होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूरसाठी गडहिंग्लज येथून सकाळी ६.३०, ७.३०, १० व दुपारी १२, २, ४ वाजता बससेवा सुरू केली आहे. सीमाभागातील लोकांची प्रवासवाहिनी म्हणून गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावरील बसफेरीची ओळख आहे. कर्नाटकातील लॉकडाऊनमुळे हिटणी नाक्यापर्यंत ही फेरीदेखील सुरू करण्यात येत आहे.
नेसरी, आजरा व गारगोटी मार्गावर सकाळी साडेसातनंतर दिवसभरात ४ फेऱ्या होणार असून प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार या फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. कोल्हापूर मार्गावर लॉकडाऊनकाळात केवळ ४ फेऱ्या सुरू होत्या त्या आता ६ फेऱ्या करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि आरोग्यदायी प्रवासासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक आहे.
विनामास्क प्रवासबंदी करण्यात आली आहे. गडहिंग्लज नगरपालिकतर्फे दररोज बसस्थानक परिसरात सॅनिटायझेशन करण्यात येते.
प्रवासात प्रत्येक फेरीवेळी बस सॅनिटायझर करून वाहक व चालकांनाही मास्क व सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमावलींचे पत्रक बसमध्ये जागोजागी लावण्यात आले आहेत.