गडहिंग्लजला ‘विज्ञान’ची केंद्रीय प्रवेश यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:51 IST2020-12-05T04:51:43+5:302020-12-05T04:51:43+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या केंद्रीय प्रवेश निवड यादी बुधवारी सायंकाळी जाहीर झाली. साधना प्रशालेचा खुल्या ...

गडहिंग्लजला ‘विज्ञान’ची केंद्रीय प्रवेश यादी जाहीर
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या केंद्रीय प्रवेश निवड यादी बुधवारी सायंकाळी जाहीर झाली. साधना प्रशालेचा खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ सर्वाधिक ९६ टक्के इतका आहे. शुक्रवार (दि.४)पासून प्रत्यक्ष प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांनी दिली.
अनुदानित तुकडीतील खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ महाविद्यालयनिहाय असा - एम. आर. ज्युनिअर कॉलेज (९४.०८), शिवराज महाविद्यालय (९१), गडहिंग्लज कनिष्ठ महाविद्यालय (९०), रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालय (९२.०२)
विना-अनुदानित तुकडीतील खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ महाविद्यालयनिहाय असा - रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालय (८७.४), शिवराज महाविद्यालय (७२.४), साधना ज्युनि. कॉलेज (८७), एम. आर. ज्युनि. कॉलेज (८६.६), गडहिंग्लज महाविद्यालय (५०.४), क्रिएटिव्ह ज्युनि. कॉलेज (६९.४), साई इंटरनॅशनल स्कूल (५८), मराठा मंदिर ज्युनि. कॉलेज (७४.२), साधना विद्यालय (५०.८)
अनुदानित व विनाअनुदानित तुकड्यातील एकूण प्रवेश क्षमता १५४० असून, १२२० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. निवड यादीसंदर्भातील तक्रारींचे निराकरण गुरुवारी (दि. ३) सकाळी ११ ते ५ या वेळेत एम. आर. हायस्कूल येथे करण्यात येणार आहे.