गदिमांच्या स्मारकासाठी सहा देशांत होणार जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:27 IST2020-12-06T04:27:06+5:302020-12-06T04:27:06+5:30
कोल्हापूर : महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी होणाऱ्या जनआंदेालनाची व्याप्ती वाढत आहे. हे आंदोलन केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर ...

गदिमांच्या स्मारकासाठी सहा देशांत होणार जागर
कोल्हापूर : महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी होणाऱ्या जनआंदेालनाची व्याप्ती वाढत आहे. हे आंदोलन केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर चार राज्यांत आणि सहा देशांत होणार आहे. गदिमांच्या कवितांचे वाचन आणि गायन करणे असे हे अनोखे आंदोलन असून, याची सुरुवात १४ डिसेंबरपासून होत असल्याची माहिती संयोजन समितीचे संयोजक प्रदीप निफाडकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
यामध्ये म्हटले आहे, पुणे येथे महाकवी ग. दि. माडगूळकर यांचे स्मारक होण्यासाठी ४३ वर्षांपासून मागणी होत आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे स्मारकासाठी जनआंदोलन छेडले आहे. प्रथम महाराष्ट्रापुरतेच हे आंदोलन होते; पण देश परदेशातील रसिकांनी भाग घेण्याची तयारी दर्शविली असून, त्याची व्याप्ती वाढत आहे. अमेरिकेमध्ये मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांची कन्या कादंबिनी धारप, पुरुषोत्तम थेटे, क्षितीज जोशी घोलप, वंदना हांडे आंदोलन करणार आहेत. मुंकद कुलकर्णी, मंजूषा कुलकर्णी, डॉ. प्रकाश साळुंके इंग्लंडमध्ये आंदोलन करणार आहेत. म्यानमारमध्ये रघुनाथ फाटक, नेदरलँड येथे आदिती अवघट, इटली येथे अपूर्वा मुळे आंदोलनात सहभागी होणार आहे. याचप्रमाणे भोपाळ, कर्नाटक येथेही आंदोलन होणार आहे.