गैबी घाटात डोंगराला अनेक ठिकाणी भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:47+5:302021-05-31T04:18:47+5:30
सोळांकूर : निपाणी-राधानगरी राज्यमहामार्गावर सोळांकूर नजीक गैबी घाटात रस्ताकडेला डोंगरावर अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या असून या ठिकाणी ...

गैबी घाटात डोंगराला अनेक ठिकाणी भेगा
सोळांकूर : निपाणी-राधानगरी राज्यमहामार्गावर सोळांकूर नजीक गैबी घाटात रस्ताकडेला डोंगरावर अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या असून या ठिकाणी दरड कोसळून भूस्खलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या निपाणी-देवगड राज्य महामार्गाचे काम रखडले आहे. नुकतेच सोळांकूर गैबी रस्ताचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम संपत आले आहे. रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर धोकादायक उत्खनन केले आहे. यामुळे गेल्या दोन पावसाळ्यात या घाटात सतत दरडी कोसळण्याचा घटना घडत होत्या. या घाटात धोकादायक वळणे आहेत. पावसाळ्याचा तोंडावर भेग पडलेला भराव नाही काढला तर हा भराव रस्तावर येऊन अनर्थ घडण्याची शक्यता आहे. तसेच वाहतूकही पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे.
सध्या या मार्गावर पश्चिम महाराष्ट्रसह कर्नाटकातून तळकोकण व गोवाकडे रोज हजारो लहान व अवजड वाहनांची २४ तास वाहतुकीची वर्दळ सुरू असते. तसेच शेतकरीवर्गाची नेहमी या ठिकाणी ये-जा सुरू असते. त्यामुळे एखादा अनर्थ घडण्याअगोदर सदरचा डोंगराचा भेग पडलेला भराव काढून घ्यावा, अशी मागणी होत आहे.
फोटोओळ-
गैबीघाटात सोळांकूर येथे डोंगरावर पडलेल्या भेगा.