आयजीएमध्ये औषधांना बुरशी, रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:10+5:302021-06-18T04:17:10+5:30
इचलकरंजी : आयजीएम रुग्णालयामध्ये रुग्णांना देण्यात येत असलेल्या औषधांना बुरशी आल्याने गोंधळ उडाला. तर काही वृद्ध नागरिकांनी हे औषध ...

आयजीएमध्ये औषधांना बुरशी, रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण
इचलकरंजी : आयजीएम रुग्णालयामध्ये रुग्णांना देण्यात येत असलेल्या औषधांना बुरशी आल्याने गोंधळ उडाला. तर काही वृद्ध नागरिकांनी हे औषध तसेच सेवन केल्याचे सांगितले. त्यामुळे या नव्या प्रकाराबाबत रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुग्णालयातील वॉर्ड नं. ४४ मध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांना सकाळी पित्तनाशक औषध दिले जाते. गुरुवारी देण्यात आलेल्या औषधास बुरशी आल्याचे काही रुग्णांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ तेथे उपस्थित असलेल्या परिचारिकेस माहिती दिली. वरिष्ठांना याबाबत विचारले असता त्यांनी औषधे पाहून रुग्णांना देण्याच्या सूचना दिल्या. या प्रकाराबाबत रुग्ण व नातेवाइकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू होती.
दरम्यान, या प्रकाराबाबत रुग्णालय प्रशासनास विचारले असता त्यांनी, या औषधांची मुदत संपली नसून औषधांचे पाकिट लीक झाले असावे. त्यातूनच वातावरणाच्या परिणामामुळे हा प्रकार झाल्याचा अंदाज वर्तविला.
फोटो ओळी
१७०६२०२१-आयसीएच-०४
आयजीएम रुग्णालयामध्ये औषधांना बुरशी आली आहे.