कुटवाडचे जवान राजेंद्र पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:23+5:302021-08-20T04:29:23+5:30
पाटील यांचे पार्थिव सकाळी आठ वाजता गावात दाखल झाल्यानंतर मराठी शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर गावातील प्रमुख ...

कुटवाडचे जवान राजेंद्र पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
पाटील यांचे पार्थिव सकाळी आठ वाजता गावात दाखल झाल्यानंतर मराठी शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावर त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, तहसीलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, नायब सुभेदार डी.सी. ठोकळ, अमरसिंह पाटील, सावकर मादनाईक, मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी, सैनिक फेडरेशनचे विजय पाटील, संजय माने, रमेश निर्मळे, केरबा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - १९०८२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - कुटवाड (ता. शिरोळ) येथील जवान राजेंद्र पाटील यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यस्कार करण्यात आले.