कोरोनाबाधित मृतदेहावर अनेकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:19 IST2021-06-05T04:19:27+5:302021-06-05T04:19:27+5:30

येथील ग्रामपंचायतीमध्ये महादेव पोवार नावाची व्यक्ती शिपाई म्हणून रोजंदारीवर शिपाई म्हणून कामास आहे. त्याच्या भावाचा इचलकरंजी येथील जावयाला कोरोनाची ...

Funeral in the presence of many on the corona-infested corpse | कोरोनाबाधित मृतदेहावर अनेकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

कोरोनाबाधित मृतदेहावर अनेकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

येथील ग्रामपंचायतीमध्ये महादेव पोवार नावाची व्यक्ती शिपाई म्हणून रोजंदारीवर शिपाई म्हणून कामास आहे. त्याच्या भावाचा इचलकरंजी येथील जावयाला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालायात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्या रुग्णालायत दंगा घालून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह इचलकरंजीला न नेता तो पट्टणकोडोलीत आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत हा कोरोना रुग्ण असूनही त्याच्या अंत्यविधीला अनेकांनी उपस्थिती लावली होती. येथीलच सार्वजनिक स्मशानभूमीत मृतदेह आणुन मृतदेह पॅक केलेल्या प्लॅस्टिकला कापून संबंधित शिपायाने जमलेल्यांना शेवटचे तोंड दाखवूनच अग्नी दिला. यावेळी नातेवाइकांनीही कोणतीच दक्षता घेतली नाही.

या प्रकाराची माहिती व व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होताच ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. मात्र संबंधित प्रशासकीय यंत्रणा मात्र सुस्तच आहे.

Web Title: Funeral in the presence of many on the corona-infested corpse