शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

N D Patil : अंत्यदर्शनावेळचा माईंचा धीरोदात्तपणा अन् शरद पवारांची साथ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 18:02 IST

माईंचा अंत्यदर्शनावेळचा धीरोदात्तपणा आणि बहिणीच्या मागे सावली बनून राहिलेले शरद पवार असा भावा-बहिणीतील नात्याचा अनोख्या कुटुंबवत्सलतेचा पदर मंगळवारी अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला आणि भाऊ असावा तर असा, असे शब्द आपसुकच बाहेर पडले.

कोल्हापूर : चळवळीतील संघर्षयात्रीच्या मागे पहाडासारख्या उभ्या राहिलेल्या माईंचा अंत्यदर्शनावेळचा धीरोदात्तपणा आणि बहिणीच्या मागे सावली बनून राहिलेले शरद पवार असा भावा-बहिणीतील नात्याचा अनोख्या कुटुंबवत्सलतेचा पदर मंगळवारी अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला आणि भाऊ असावा तर असा, असे शब्द आपसुकच बाहेर पडले. पवार कुटुंबीयांतील जिव्हाळा, त्यांचा साधेपणा याची झलकही यानिमित्ताने दिसली.

एन.डी.पाटील यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर सोमवारीच शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीय कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. आल्या वेळपासून ते अंत्यसंस्कारापर्यंतची सर्व सूत्रे सांभाळतानाच सरोज पाटील ऊर्फ माई यांना धीर देताना या कुटुंबातील नात्याची वीण किती घट्ट आहे, हे दिसत होते. मोठ्यांचा मान आणि लहानांना प्रेम या सूत्राचीही प्रचिती येत होती. त्यामुळे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असतानादेखील कुटुंबीयांच्या बैठक व्यवस्थेत ते तिसऱ्या आणि चौथ्या रांगेतच बसल्याचे दिसले.अंत्यदर्शनासाठी पटांगणावर उभारलेल्या व्यासपीठावर पहिल्या रांगेत शरद पवार, माई, प्रतापराव पवार हे बसले होते, त्यांच्या मागच्या रांगेत माई यांच्या बहिणी , त्यांची मुले, सुना होत्या. मागील शेवटच्या रांगेत पार्थ पवार, रोहीत पवार बसले होते. कुठे भपकेबाजी न करता नात्यातील भावबंध सांभाळताना कुटुंबीय दिसत होते. पार्थीव उचलताना अमर रहेच्या घोषणांचा गजर सुरू असताना इतके सकाळपासून धीरोदात्तपणे बसलेल्या माईंना एकदम गलबलून आले. त्यांची ही अवस्था बघून बाजूलाच बसलेले शरद पवार यांनी त्यांचा हात हातात धरुन धीर देण्याचा प्रयत्न केला. याचवेळी मागे बसलेल्या त्यांच्या बहिणी, सुनांनी लगेच धाव घेत माईंच्या भोवती गराडा टाकला. त्यांना कुठेही एकटे वाटू नये, यासाठी सर्व कुटुंबीय प्रयत्न करताना दिसत होते.

शरद पवार हे मंगळवारी सकाळी आठ वाजताच पटांगणावर पार्थीव ठेवलेल्या व्यासपीठावर माईंच्या शेजारीच खुर्ची टाकून बसले होते. दुपारी एकपर्यंत ते एकाच जागेवर बसून होते. या काळात ते येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या सांत्वनाचा स्वीकार करत होते. दोघांचेही वय झालेले, शरीर साथ देत नसतानाही संयमाचे दर्शनच त्यांनी घडवले. ते एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत, म्हटल्यावर अंत्यदर्शनासाठी आलेल्यांचाही पाय निघत नव्हता. थोडावेळ व्यासपीठावर बसून बाजूला केलेल्या बैठक व्यवस्थेत नेतेे बसलेले दिसत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरN D Patilप्रा. एन. डी. पाटीलSharad Pawarशरद पवार