राधानगरी तलाठी, मंडल अधिकारी कार्यालयास निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST2021-05-23T04:24:11+5:302021-05-23T04:24:11+5:30

अधिकारी कार्यालयांच्या इमारतींसाठी २ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी ...

Funds sanctioned to Radhanagari Talathi, Mandal Officer's Office | राधानगरी तलाठी, मंडल अधिकारी कार्यालयास निधी मंजूर

राधानगरी तलाठी, मंडल अधिकारी कार्यालयास निधी मंजूर

अधिकारी कार्यालयांच्या इमारतींसाठी २ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर

झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.

गावांमध्ये स्वतंत्र असे तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय नसल्याने बहुतांशी

तलाठी कार्यालयांचे कामकाज हे त्या त्या संबंधित मंडल कार्यालय अथवा

तालुक्याच्या ठिकाणाहून सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते.

त्यामुळे यासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालयाची मागणी होत होती. याला निधी

उपलब्ध होणेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू

होता. प्रस्ताव जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडून विभागीय आयुक्त, पुणे

यांच्यामार्फत शासनाकडे सादर केला होता. तलाठी कार्यालये व मंडल अधिकारी

कार्यालय इमारतींच्या बांधकाम करण्याकरिता २ कोटी ४७ लाख रुपये

निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

यामध्ये कसबा तारळे

तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय ३३.७९ लाख, राशिवडे बुद्रुक मंडल अधिकारी

कार्यालय २६.४० लाख, सोन्याची शिरोली तलाठी कार्यालय २६.७२ लाख, सिरसे

तलाठी कार्यालय २६.५१ लाख, लिंगाचीवाडी (फराळे) तलाठी कार्यालय २६.६५

लाख, फेजिवडे तलाठी कार्यालय २६.७५ लाख, धामोड तलाठी कार्यालय २६.७१

लाख, चंद्रे (अर्जुनवाडा) तलाठी कार्यालय २६.५४ लाख, गुडाळ तलाठी

कार्यालय २६.५४ लाख यांचा समावेश आहे. या कामांच्या निविदा प्रक्रिया

करून तातडीने कामे हाती घेण्यात येतील, असे आमदार आबिटकर यांनी सांगितले.

Web Title: Funds sanctioned to Radhanagari Talathi, Mandal Officer's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.