शिरोळला अग्निशमन वाहन खरेदीसाठी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST2021-05-10T04:23:08+5:302021-05-10T04:23:08+5:30

शिरोळ : शिरोळ नगरपालिकेला अग्निशमन केंद्राची प्रतीक्षा लागून राहिली असतानाच पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून अग्निशमन गाडीसाठी ...

Funds for purchase of fire fighting vehicle at Shirol | शिरोळला अग्निशमन वाहन खरेदीसाठी निधी

शिरोळला अग्निशमन वाहन खरेदीसाठी निधी

शिरोळ : शिरोळ नगरपालिकेला अग्निशमन केंद्राची प्रतीक्षा लागून राहिली असतानाच पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून अग्निशमन गाडीसाठी ४० लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. नगरपालिकेने याबाबतचा प्रस्ताव पाठवून पुढील कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

शिरोळ नगरपालिकेअंतर्गत शहरात अग्निशमन केंद्राची आवश्यकता असल्याने पालिकेने ठराव करून एक कोटी रुपयाचा प्रस्ताव दहा महिन्यांपूर्वी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. शासनाकडून निधीची प्रतीक्षा लागून राहिली असतानाच पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून अग्निशमन गाडीसाठी ४० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे. अग्निशमन सेवा व आणीबाणी सेवांच्या बळकटीकरण योजना अंतर्गत शिरोळ नगरपालिकेने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे आदेश जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी दिले आहेत. येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावा, अशा देखील सूचना दिल्या आहेत.

तीन वर्षापूर्वी नगरपालिकेची स्थापना झाली आहे. त्यामुळे पालिकेची स्वतंत्र अग्निशमन केंद्राची व्यवस्था असावी, अग्निशमन बंबाबरोबर केंद्राची अवस्था, त्याचठिकाणी पार्किंग व पाणी व्यवस्था करण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयाचा प्रस्ताव पालिकेने शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाच्या कार्यवाहीकडे लक्ष लागून राहिले असताना पालकमंत्र्यांनी अग्निशमन वाहन खरेदीसाठी ४० लाख रुपये अनुदानाला मंजुरी दिली आहे. दरम्यान, अग्निशमन केंद्राची परिपूर्ण व्यवस्था करण्यासाठी आणखी निधीची गरज लागणार आहे. 'लोकमत'ने याबाबत वृत्त प्रसिध्द करून लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते.

फोटो - ०९०५२०२१-जेएवाय-०५-लोकमतचे वृत्त

Web Title: Funds for purchase of fire fighting vehicle at Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.