श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:27 IST2021-01-16T04:27:16+5:302021-01-16T04:27:16+5:30
अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन करण्याची मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. विश्व हिंदू ...

श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन सुरू
अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन करण्याची मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यातील ५ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
तीन मजली आणि सुमारे एक हजारहून अधिक वर्षे टिकणारे मंदिर उभारण्याची प्रक्रिया अयोध्येत सुरू झाली आहे. यासाठी सर्वसामान्यांचाही सहभाग असावा, या हेतूने दहा, शंभर आणि एक हजार रुपयांच्या पावत्या तयार करण्यात आल्या आहेत. ४८ तासांत जमा निधी बँकेत न्यासाच्या खात्यावर जमा केला जातो. ३१ जानेवारी २०२१ पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. या कालावधित कोल्हापूर जिल्ह्यातील १२०० गावांतील व शहरी १५७ वस्त्यांमध्ये घरोघरी कार्यकर्ते रामभक्तांची भेट घेणार आहेत. याशिवाय ऑनलाईन आणि धनादेशाव्दारेही निधी स्वीकारला जाणार आहे.
यावेळी शिवप्रसाद व्यास, जिल्हा अभियानप्रमुख रणजितसिंह घाटगे, भगीरथ महाराज यादव, सूर्यकिरण वाघ यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.