विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:22 IST2021-02-14T04:22:47+5:302021-02-14T04:22:47+5:30
चुये : निगवे खालसा (ता. करवीर) येथे ५६ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ...

विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही
चुये : निगवे खालसा (ता. करवीर) येथे ५६ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आमदार ऋतुराज पाटील यांनी विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही देत गावच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असल्याचे सांगितले.
निगवे खालसामधील महाकाली तालीम इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाचा शुभारंभ, रमेश गोंगाणे ते कांता गोंगाणे घर रस्ता खडीकरण/डांबरीकरण, किल्लेदार आणि कुंभार गल्ली रस्ता काँक्रिटीकरण,मुख्य रस्ता ते गोंगाणे वसाहत रस्ता खडीकरण/डांबरीकरण, तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत हाफ राउंड गटर बांधणे, नागरी सुविधा योजनेंतर्गत अभ्यासिका बांधकाम, इतर जिल्हामार्ग एकशे शहाऐंशीपासून निगवे खालसा ते परिते ग्रामीण मार्ग खडीकरण, डांबरीकरण ही कामे आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागणार आहेत. या कामांचा आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ केला. यावेळी बिद्रीचे संचालक श्रीपतीबापू पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ पाटील, माजी उपसभापती सागर पाटील, सरपंच पांडुरंग महाडेश्वर, अशोक किल्लेदार, रमाकांत गोंगाणे, विलास कांजर, प्रवीण पाटील, वाय.एस. किल्लेदार, पी.एम. पाटील, संजय कळमकर, पांडुरंग पावस्कर, संतोष किल्लेदार, संतोष राठोड उपस्थित होते.
फोटो ओळ :
निगवे (खालसा) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करताना आ. ऋतुराज पाटील, श्रीपती पाटील, एकनाथ पाटील, सागर पाटील अशोक किल्लेदार आदी. (छाया : संजय व्हनाळकर)