किणी येथील रुग्णालयाच्या इमारत बाधंकामासाठी ९० लाख रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:13+5:302021-07-14T04:28:13+5:30
पुणे-बंगलोर महामार्गावरील अपघातातील जखमींच्यावर तातडीने उपचारासाठी व पचंक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी मोठ्या शासकीय रुग्णालयाची अनेक वर्षे मागणी होती. ...

किणी येथील रुग्णालयाच्या इमारत बाधंकामासाठी ९० लाख रुपयांचा निधी
पुणे-बंगलोर महामार्गावरील अपघातातील जखमींच्यावर तातडीने उपचारासाठी व पचंक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी मोठ्या शासकीय रुग्णालयाची अनेक वर्षे मागणी होती. यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचेकडे आ. राजूबाबा आवळे यांनी पाठपुरावा केल्याने, नुकतीच या ३० खाटांच्या रुग्णालयास प्रशासकीय मंजुरी मिळून सुमारे इमारतीसाठी १४ कोटी २१ लाख रुपये खर्चाच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत उभारणीस यासाठीची तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विशेष पाठपुरावा केला. याची मंत्री टोपे व यड्रावकर यांनी दखल घेऊन बांधकामासाठीचा पहिला हप्ता म्हणून ९० लाख रुपये मिळाला असून, ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत उभारणीस लवकरच सुरवात करण्यात येणार असल्याचे आवळे यांनी सागितले. गेल्याच महिन्यात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. राजूबाबा आवळे यांनी हे रुग्णालय उभारण्यात येणाऱ्या महामार्गालगत असणाऱ्या जागेची अधिकाऱ्यांसह पाहणी करून, सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून मंजुरीसाठी ठेवण्याचे आदेश त्यानी अधिकाऱ्यांना दिले होते.
महामार्गावरील आपघातातील जखमींना उपचारासाठी व पचंक्रोशातील गावातील नागरिकांना सोयीसाठी रुग्णालयाची मागणी होती. रुग्णालय नागरिकांना वरदान ठरणार आहे.