खासदार मंडलीक यांच्या प्रयत्नातून निगवे दुमालासाठी ४७ लाखाचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:51+5:302021-05-31T04:18:51+5:30

कोल्हापूर : निगवे दुमालाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेऊ, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलीक यांनी केले. निगवे दुमाला (ता. ...

Fund of Rs. 47 lakhs for Nigve Dumala through the efforts of MP Mandlik | खासदार मंडलीक यांच्या प्रयत्नातून निगवे दुमालासाठी ४७ लाखाचा निधी

खासदार मंडलीक यांच्या प्रयत्नातून निगवे दुमालासाठी ४७ लाखाचा निधी

कोल्हापूर : निगवे दुमालाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेऊ, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलीक यांनी केले.

निगवे दुमाला (ता. करवीर) येथील विकास कामासाठी खासदार संजय मंडलीक यांच्या प्रयत्नातून ४७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांचे रविवारी त्यांच्याच हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा एकशिंगे होत्या.माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील हे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा नियोजनामधून पूरहानी व अतिवृष्टी या योजनेतून रस्ता दुरुस्ती, संरक्षण भिंतीसाठी ३७ लाख तर व गटारीसाठी १० लाख असा एकूण ४७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. उद्घाटनानंतर बोलताना मंडलीक यांनी निगवे दुमालाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेऊ, अशी ग्वाही दिली.

माजी सरपंच सुरेश पाटील यांनी हा निधी मंडलीक यांच्या प्रयत्नातून मिळाल्याचे सांगितले. स्वागत जय हिंद विकास संस्थेचे माजी चेअरमन डॉ. एम. बी. किडगावकर यांनी केले. अर्जुन पाटील यांनी आभार मानले. यावेळी उपसरपंच धनाजी पाटील, प्रकाश पाटील ,सतीश कुरणे, बत्तासो चौगले, रणजित पाटील राजाराम कासार, कृष्णात जासूद, सर्जेराव पाटील, बत्तासे एकशिंगे, एकनाथ दळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो: ३००५२०२१-कोल-मंडलीक

कोल्हापूर: निगवे दुमाला (ता. करवीर) येथील विकासकामांचे उद्घाटन खासदार संजय मंडलीक यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, डॉ. एम. बी. किडगावकर उपस्थित होते.

Web Title: Fund of Rs. 47 lakhs for Nigve Dumala through the efforts of MP Mandlik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.