हातकणंगले मतदारसंघातील रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:43 IST2021-03-13T04:43:50+5:302021-03-13T04:43:50+5:30
यामध्ये राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अमृतनगर ते हातकणंगलेपर्यंतच्या रस्त्यासाठी निधी मिळणे ही ...

हातकणंगले मतदारसंघातील रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी
यामध्ये राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अमृतनगर ते हातकणंगलेपर्यंतच्या रस्त्यासाठी निधी मिळणे ही महत्त्वाची गरज होती. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. यासाठी सतत पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून या कामासाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
तसेच वडगाव -लाटवडे-खोची-दुधगाव या प्रमुख जिल्हा मार्गासाठी अडीच कोटी मंजूर झाले असून रुंदीकरणासह मजबुतीकरण होणार आहे. सांगली जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता आहे.
हातकणंगले-लक्ष्मी इंडस्ट्रीज- रुई फाटा तसेच रुई फाटा ते तळंदगे रस्ता या दोन्ही रस्त्यांसाठी साडेचार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पट्टणकोडोली-हुपरी-रेंदाळ ते राज्य हद्द रस्ता, दोन्ही बाजूला गटर्स बांधण्यासाठी ऐंशी लाख मंजूर झाले आहेत. तसेच रस्ते दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये मंजूर झाल्याने मतदारसंघात वाहतुकीची उत्तम सोय निर्माण होणार आहे.
महापूर, अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची कामे तातडीने व्हावीत अशी लोकांची मागणी होती. त्याचा मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून निधीसाठी प्रयत्न केल्याचे आमदार आवळे यांनी सांगितले.