शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळाच्या भूसंपादनासाठी २१२ कोटींचा निधी, पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 11:21 IST

या विमानतळ विस्तारीकरणासाठी यापूर्वी ५३ कोटी रुपये इतक्या निधीला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यापैकी उर्वरित २६ कोटी रुपयांचा निधी दि. २१ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यात आला.

मुंबई : कोल्हापूरविमानतळ विस्तारीकरणांतर्गत भूसंपादनासाठी २१२ कोटी २५ लाख रुपये इतक्या निधीसाठी मान्यता देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. ही मान्यता निश्चितपणे कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर विमानतळ हे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याकरिता विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २५.९१ हेक्टर जमिनीचे संपादन करणे गरजेचे होते. त्यासाठी निधीची आवश्यकता होती. या विमानतळ विस्तारीकरणासाठी यापूर्वी ५३ कोटी रुपये इतक्या निधीला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यापैकी उर्वरित २६ कोटी रुपयांचा निधी दि. २१ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यात आला.विस्तारीकरणाच्या पुढील निधीसाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांनी २१२ कोटी २५ लाख इतक्या निधीचा प्रस्ताव प्रशासकीय व वित्तीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला शासनाच्या शक्ती प्रदत्त समितीची मान्यता मिळणे आवश्यक होते. या समितीने सोमवारच्या बैठकीत माझ्या मागणीचा सकारात्मक विचार करीत विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २१२ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीच्या प्रस्तावास मान्यता दिली.त्यासाठी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विमानचालन संचालनालयाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविकास आघाडी सरकार हे जनतेचे सरकार असून, राज्याच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. कोल्हापूर विमानतळासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानतो.

कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळाचा होत असलेला विस्तार महत्त्वपूर्ण आहे. विमानतळ विस्तारीकरणांतर्गत भूसंपादनासाठी २१२ कोटी २५ लाख रुपये इतक्या निधीसाठी मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध क्षेत्रातील कोल्हापूरचे महत्त्व हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून सोमवारी झालेल्या बैठकीत अधोरेखित करण्यात आले आहे. - सतेज पाटील, पालकमंत्री

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील