शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या औद्योगिक धोरणास संपूर्ण सहकार्य, उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

By समीर देशपांडे | Updated: April 23, 2024 19:00 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असून नवीन औद्योगिक वसाहती स्थापण्यासह कोल्हापूरमध्ये आय.टी.पार्क उभारण्यासह सर्वंकष धोरण बनवून ...

कोल्हापूर : कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असून नवीन औद्योगिक वसाहती स्थापण्यासह कोल्हापूरमध्ये आय.टी.पार्क उभारण्यासह सर्वंकष धोरण बनवून त्यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. नवीन एमआयडीसीच्या माध्यमातून साडे सहाशेहे एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल असेही ते म्हणाले.कोल्हापूर येथे मंगळवारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजतर्फे जिल्ह्यातील प्रमुख उद्योजकांची उद्योग मंत्र्यांसमवेत संवाद बैठक झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी होते. जिल्ह्यातील एमआयडीसीचा विस्तार, वीज दरवाढ तोडगा, पूर्वीच्या जागा हस्तांतरणावरील जीएसटी मागणी रद्द करणे, इलेक्ट्रॉनिक पार्कला मंजूरी, विस्तारीकरणासाठी जागेची उपलब्धता, वीज उपलब्धता, नवीन उद्योग आणणे, आय.टी.पार्क उभारणी आणि कोल्हापूर-सांगली विभागाला ‘फाऊंड्री हब’ घोषित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी उद्योजक विजय मेनन, प्रकाश राठोड, सुरेंद्र जैन, सचिन मेनन, प्रसाद मंत्री, भरत जाधव, आनंद देशपांडे, अजय सप्रे, सचिन शिरगांवकर, मंगेश पाटील, शंकर दुल्हाणी, रवि डोली, जयेश ओसवाल, अश्‍विनी दानीगोंड, प्रकाश मेहता, राजु पाटील, राहूल सातपुते, शितल संघवी, रणजित जाधव उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरUday Samantउदय सामंत