आवाडेंना उमेदवारी दिल्यास ‘शविआ’चा पूर्ण पाठिंबा

By Admin | Updated: November 27, 2015 01:10 IST2015-11-27T01:10:36+5:302015-11-27T01:10:58+5:30

विधानपरिषदेचे राजकारण : पक्षप्रतोद अजित जाधव यांची ग्वाही

Full support of 'Shawiya' if Awaden gives candidacy | आवाडेंना उमेदवारी दिल्यास ‘शविआ’चा पूर्ण पाठिंबा

आवाडेंना उमेदवारी दिल्यास ‘शविआ’चा पूर्ण पाठिंबा

इचलकरंजी : विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना उमेदवारी दिली तर त्यांना शहर विकास आघाडी व कारंडे गटाच्या नगरसेवकांचा पाठिंबा असेल. इतकेच नव्हे, तर इचलकरंजीच्या विकासासाठी आवाडे यांना विजयी करू व अन्य नगरपालिकांतील नगरसेवकांचे मतदान मिळविण्यासाठी शहर विकास आघाडी जोरदार प्रयत्न करेल, अशी ग्वाही या आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ‘शविआ’चे निमंत्रक तानाजी पोवार व प्रमोद पाटील उपस्थित होते. सुरेश हाळवणकर हे इचलकरंजीचे आमदार असून, विधान परिषदेच्या निमित्ताने या शहरास आवाडेंच्या रूपाने आणखीन एक आमदार मिळत असेल, तर शहराचा विकास अधिक गतीने होईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
आमदार हाळवणकर व आवाडे यांची गुरुवारी एका कार्यक्रमात भेट झाली. यावेळी आवाडे यांनी कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींचे माझ्या उमेदवारीवर एकमत झाले आहे, असे हाळवणकर यांना सांगितले. माझी उमेदवारी निश्चित झाली असून, त्यासाठी तुम्ही मला पूर्णपणे पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली, अशी माहिती देऊन जाधव म्हणाले, शहराला दोन आमदार मिळाले तर काळम्मावाडी धरणातून थेट पाणी योजना, आयजीएम रुग्णालयाचे शासनाकडे हस्तांतरण, सोलर सिटी, वायफाय सिटी असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार करण्यास मोलाची मदत मिळेल. म्हणून इचलकरंजी शहरातील सर्व ६२ नगरसेवकांनी आवाडे यांना निवडून द्यावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील अन्य मतेही मिळविण्याचा प्रयत्न करावा, असेही आवाहन त्यांनी केले.


आवाडेंना निवडून आणण्याची प्रामाणिक इच्छा
पत्रकार परिषदेतील माझे म्हणणे गांभीर्याने आणि जबाबदारीने मांडत आहे. आवाडे हे विधानपरिषदेसाठी निवडून यावेत, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आवाडे यांना उमेदवारी मिळाल्यास कॉँग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही, याची खात्री आवाडेंना आहे, असेही अजित जाधव यांनी स्पष्ट केले.

Web Title: Full support of 'Shawiya' if Awaden gives candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.