फरारी आरोपींचे सुरतेकडे पलायन?

By Admin | Updated: January 21, 2015 21:53 IST2015-01-21T21:52:49+5:302015-01-21T21:53:07+5:30

कोंडिवली हल्लाप्रकरण : ५८ जणांच्या मुसक्या आवळल्या, ३४ संशयित पसार

Fugitive accused flee to Surat? | फरारी आरोपींचे सुरतेकडे पलायन?

फरारी आरोपींचे सुरतेकडे पलायन?

खेड : कोंडिवली - शिंदेवाडी येथे
सोमवारी पूर्ववैमनस्यातून घडलेल्या
घटनेने अवघा जिल्हा हादरला आहे.
शिंदेवाडी येथील १८ लोकांवर गंभीर
स्वरूपाचे हल्ले झाल्याचे पोलिसांनी
म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ९२
आरोपींवर गुन्हे दाखल केले असून, ५८
जणांना सोमवारी मध्यरात्रीच्या
सुमारास अटक करण्यात आली, तर ३४
जण अद्याप फरार आहेत. फरार
आरोपी त्यांच्या मूळगावी सुरत येथे
गेल्याचा संशय आहे. पोलिसांचे एक
पथक सुरतकडे रवाना झाले आहे.
कोंडिवलीतील हल्ल्यामध्ये सुरत
येथील काही हल्लेखोरांचा मोठ्या
प्रमाणात समावेश आहे. या गावातील
हे आरोपी सुरत येथे कामानिमित्त
वास्तव्य करीत आहेत. हा हल्ला एकूण
९२ लोकांनी केला असून, यातील ५८
आरोपींना अटक करण्यात पोलिसांना
यश आले आहे. ३४ आरोपी अद्याप
फरार झाले असून, त्यांना लवकरच
अटक करण्यात असा विश्वास
पोलिसांनी व्यक्त केला. संबंधित
आरोपी सुरत येथे गेले असून, त्यांना
ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक
पथक सुरत येथे रवाना झाले आहे़
अटक केलेल्या आरोपींमध्ये
दिनेश रामू शिंदे, गणेश दामू शिंदे,
अजय अरूण उतेकर, दर्पण एकनाथ
शिंदे, महेंद्र एकनाथ शिंदे, राकेश
रामचंद्र शिंदे, प्रशांत रामचंद्र शिंदे,
उमेश दत्ताराम शिंदे, गणेश दत्ताराम
शिंदे, संदेश तुकाराम यादव, दत्ताराम
तुकाराम यादव, हनुमंत सखाराम
यादव, संजय हनुमंत यादव, संगम
हनुमंत यादव, प्रदीप रामचंद्र शिंदे,
आशिष हरीश्चंद्र शिंदे, गणपत
चंद्रकांत शिंदे, शशिकांत चंद्रकांत
शिंदे, दिनेश जनार्दन फडके, दशरथ
कृष्णा उतेकर, किरण कृष्णा उतेकर,
सूरेश विष्णू उतेकर, मंगेश दत्ताराम
भोसले, सुरेश जयराम भोसले, अनंत
विष्णू शिंदे, दत्ताराम दगडू शिंदे, दिनेश
दामु शिंदे, नरेश राजाराम शिंदे, रूपेश
राजाराम शिंदे, गणेश प्रकाश शिंदे,
प्रकाश केरू शिंदे, विरेंद्र विकास
सकपाळ, सचिन दत्ताराम शिंदे, रामचंद्र
दगडू शिंदे, बानराव जयराम शिंदे,
वामन कृष्णा शिंदे, सुनीता दामू शिंदे,
भारती सुरेश भातोसे, सुमन दत्ताराम
भातोसे, सविता मंगेश शिंदे, अर्चना
शांताराम उतेकर, नंदा कृष्णा गुडेकर,
सारीका सचिन शिंदे, सुवर्णा सुरेश
शिंदे, कडीबाई वामन उतेकर, अरूणा
एकनाथ शिंदे, मंदा अनंत भातोसे,
शेवंती बाबू शिंदे, आशा अशोक
फाळके, कुंदा रामचंद्र शिंदे, विद्या
सखाराम शिंदे, पुष्पा दत्ताराम शिंदे,
सुरेखा संदीप यादव, अशोक दगडू
फाळके, श्रीराम श्रीपत शिंदे, जनार्दन
दामू फाळके, विष्णू रघुनाथ शिंदे,
अक्षय नामदेव शिंदे यांचा समावेश
आहे.
दरम्यान, या हल्ल्यात वापरण्यात
आलेली हत्यारे ही शिंदेवाडी येथील
अशोक फाळके यांच्या घराजवळूनच
मारेकऱ्यांनी घेतली असल्याचे पोलीस
तपासात पुढे आले आहे. यामध्ये
दिसेल त्याला मारहाण करण्यात
आली. शैलेश शिंदे आणि बळीराम
शिदे यांना त्यांच्या घरात घुसून
मारहाण करण्यात आली. तसेच त्यांची
पत्नी, मुलगा आणि भाऊ यांनाही
मारहाण करण्यात आली. त्यानंतर
मधुकर चव्हाण यांच्या घरात घुसून
त्यांच्या दोन्ही पायावर चहुबाजूंनी
हल्ला करण्यात आला. त्यांच्या
दुचाकीतील ५० हजार रूपये आरोपींनी
लंपास केले आहेत. त्यांचे भाऊ
विनायक चव्हाण यांनाही त्यांनी सोडले
नाही़ त्यानंतर रमेश शिंदे यांच्या
रिक्षाची तोडफोड केली. यावेळी त्यांनी
तेथून पळ काढल्याने ते सुदैवाने
बचावले़ मात्र, त्यांची पत्नी आणि
चुलते यांना मोठ्या प्रमाणात मारहाण
करण्यात आली. (प्रतिनिधी)


विद्यार्थ्यांवरही हल्ला
यावेळी दुकानात साहित्य खरेदी
करण्याकरिता आलेले रवींद्र दगडू
शिंदे आणि संतोष सीताराम शिंदे
यांनाही बेदम मारहाण करण्यात
आली़ हल्लेखोर एवढ्यावरच
थांबले नाहीत, तर याचवेळी
हायस्कूलला जाणाऱ्या तेथील
विद्यार्थ्यांवरदेखील हल्ला
करण्याचा क्रूरपणा जमावातील
काही जणांनी दाखविला. त्याचा
निषेध केला जात आहे.

तंटामुक्त समिती
अध्यक्षांनाही केले लक्ष...
पहिले लक्ष्य माजी सरपंच आणि
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कैलास
पांडुरंग शिंदे हे होते. ते आपले दुकान
उघडत असताना त्यांच्यावर हा हल्ला
चढवण्यात आला. चहु बाजूंनी दोन्ही
पायांवर हल्ला झाल्याने ते जायबंदी
झाले. त्यानंतर दुकानाची तोडफोड
केली. त्यांच्या दुचाकीचीही तोडफोड
झाली.

दरम्यान, अटकेतील आरोपींना खेड येथील
न्यायालयात हजर करण्यात आले असता
न्यायालयाने त्यांना २ दिवस पोलीस
कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या
हल्ल्यासाठी आरोपींनी वापरलेली हत्यारे,
मधुकर चव्हाण यांच्या दुचाकीमधील चोरीस
गेलेले ५० हजार रूपये रोकड आदींबाबत
आरोपींकडून माहिती हवी असल्याने
पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती़
पोलिसांची विनंती न्यायालयाने मान्य करीत
अखेर या आरोपींना दोन दिवसांची
पोलीसकोठडी सुनावली आहे़

Web Title: Fugitive accused flee to Surat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.