नेत्यावरील निष्ठेचे फळ गोकुळच्या रूपाने मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST2021-06-25T04:17:27+5:302021-06-25T04:17:27+5:30

प्रयाग चिखली : गेली पंधरा वर्षे शिवसेना पक्षावर व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यावर निष्ठा ठेवून केलेल्या कामाचे ...

The fruit of loyalty to the leader came in the form of Gokul | नेत्यावरील निष्ठेचे फळ गोकुळच्या रूपाने मिळाले

नेत्यावरील निष्ठेचे फळ गोकुळच्या रूपाने मिळाले

प्रयाग चिखली : गेली पंधरा वर्षे शिवसेना पक्षावर व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यावर निष्ठा ठेवून केलेल्या कामाचे फळ गोकुळच्या संचालकरूपात मिळाले, अशी भावना गोकुळचे संचालक एस.आर. पाटील यांनी व्यक्त केली. वरणगे येथील हनुमान विकास सेवा संस्थेच्या वतीने मार्केट कमिटीचे शासन नियुक्त सदस्य मारुती ढेरे, गोकुळचे नूतन संचालक एस.आर. पाटील आणि बाबासाहेब चौगले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी चेअरमन के.पी. पाटील, व्हा. चेअरमन बळवंत पाटील, संचालक रघुनाथ पाटील, शंकर पाटील, नामदेव पाटील, दत्तात्रय पाटील शंकरराव पाटील, करवीर काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पाटील, माजी सरपंच नामदेव पाटील, प्रकाश पाटील, बळी पाटील, सचिव विलास खाडे, मॅनेजर एम.डी. जगदाळे उपस्थित होते.

Web Title: The fruit of loyalty to the leader came in the form of Gokul