शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

‘एफआरपी’त २०० रुपये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:47 AM

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पुढील हंगामासाठी (२०१८-१९) उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्याने ‘एफआरपी’ची रक्कम तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.शेतकºयांचा उत्पादन खर्च, बाजारातील साखरेचे ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पुढील हंगामासाठी (२०१८-१९) उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्याने ‘एफआरपी’ची रक्कम तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.शेतकºयांचा उत्पादन खर्च, बाजारातील साखरेचे दर व साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालून उसाची एफआरपी निश्चित करण्याचे काम केंद्रीय कृषिमूल्य आयोग करतो. साधारणत: बाजारपेठेतील साखरेच्यादराचा ठोकताळा बांधूनच हा दर ठरविला जातो. हंगाम २०१५-१६ मध्ये ९.५ टक्के साखर उताºयाला २३०० रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक टक्क्याला २४८ रुपये ‘एफआरपी’ निश्चित करण्यात आलीहोती. दुसºया हंगामासाठी ‘एफआरपी’मध्ये वाढ करण्याची मागणी शेतकरीसंघटनांनी केली होती; पण बाजारपेठेतील साखरेचे दर पाहता ‘एफआरपी’मध्ये बदल झालाच नाही. सलग दोन वर्षे एकच ‘एफआरपी’ राहिली. त्यानंतरच्या २०१७-१८ (म्हणजेच चालू हंगामासाठी) ‘एफआरपी’मध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ९.५ साखर उताºयासाठी २५५० रुपये; तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २६८ रुपये अशी एफआरपी मिळणार आहे. यंदाचा हंगाम अजून सुरू व्हायचा आहे. ऊसदराची कोंडी अद्याप फुटलेली नाही. वाढीव एफआरपी व शेतकरी संघटनांची मागणी यामध्ये सरकारला तडजोड करावी लागणार आहे. तोपर्यंत पुढील हंगामासाठी (२०१८-१९) प्रतिटन दोनशे रुपयांच्या वाढीची शिफारस कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये वाढ मिळणार आहे. त्यामुळे पुढील हंगामातील ‘एफआरपी’ तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.चढ-उतार निधीची पुन्हा मागणीबाजारातील वर्षभरातील साखरेच्या दराचा अंदाज गृहीत धरून ‘एफआरपी’ काढली जाते. त्यामुळे पुढे दर कोसळले तर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जातात. यासाठी साखर चढ-उतार निधीची संकल्पना कृषिमूल्य आयोगाने आणली होती, त्याला केंद्राने मंजुरी दिलेली नाही.कशी ठरविली जाते ‘एफआरपी’...शेतकºयांचा उसाचा उत्पादन खर्चआंतर पिकांपासून घेतलेले उत्पन्नसाखर कारखान्यांचा उत्पादन खर्चबाजारातील साखरेचा सरासरी दरग्राहकांना कमीत कमी दरात साखर मिळाली पाहिजे.अशी राहिली एफआरपीहंगाम ९.५ उताºयाला त्यापुढील२०१५-१६ २३०० रुपये २४८ रुपये२०१६-१७ २३०० रुपये २४८ रुपये२०१७-१८ २५५० रुपये २६८ रुपये२०१८-१९ २७५० रुपये २८० रुपये

टॅग्स :agricultureशेती