इचलकरंजी पालिकेवर मोर्चा

By Admin | Updated: October 7, 2016 00:42 IST2016-10-07T00:34:45+5:302016-10-07T00:42:38+5:30

जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन : अस्वच्छ, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

Front of Ichalkaranji Palike | इचलकरंजी पालिकेवर मोर्चा

इचलकरंजी पालिकेवर मोर्चा

इचलकरंजी : येथील मुरदंडे मळा परिसरातील नागरिकांना अनेकवेळा तक्रारी, आंदोलने करूनही स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. याचा निषेध करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नुकताच पालिकेवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम तातडीने करण्याचे आश्वासन दिले.
मुरदंडे मळा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अपुरा व अस्वच्छ पाणीपुरवठा होतो. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी उखडलेला रस्ता पुन्हा तयार केला नाही. तसेच परिसरातील अनेक प्रलंबित कामांबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेकडून दुर्लक्ष केले जाते. याबाबत नागरिकांनी जाब विचारला. हा मोर्चा नगरसेवक महादेव गौड, शीतल दत्तवाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी महावीर जैन, सुरेश भुत्ते, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Front of Ichalkaranji Palike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.