ब्लेसिंग, कोल्हापूर पोलीस यांची आगेकूच
By Admin | Updated: April 9, 2015 00:00 IST2015-04-08T23:36:35+5:302015-04-09T00:00:53+5:30
राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा

ब्लेसिंग, कोल्हापूर पोलीस यांची आगेकूच
कोल्हापूर : माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत हनुमान ब्लेसिंग संघ, कोल्हापूर पोलीस संघ, डायमंड, सुभद्रा डांगे संघ या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करत स्पर्धेची पुढील फेरी गाठली.
लाईन बाजार हॉकी मैदान येथे बुधवारी सकाळच्या सत्रात पहिला सामना हनुमान ब्लेसिंग संघ व शिवतेज संघ यांच्यात झाला. हा सामना ब्लेसिंग संघाने ५-० असा जिंकला. त्यात अमित शिंदे, नीलेश घाटगे, आशिष खापडे यांनी गोल केले, तर दुसरा सामना कोल्हापूर पोलीस संघ व ध्यानचंद हॉकी संघटना (सांगली) यांच्यात झाला. हा सामना कोल्हापूर पोलीस संघाने ८-१ असा जिंकला. तिसरा सामना सहारा स्पोर्टस् व डायमंड स्पोर्टस् यांच्यात झाला. हा सामना डायमंड स्पोर्टस्ने ९-० असा दणदणीत जिंकला.
दुपारच्या सत्रात सुभद्रा डांगे संघ विरुद्ध पद्मा पथक यांच्यात सामना झाला. हा सामना डांगे संघाने ५-१ असा जिंकला, तर दुसरा सामना फलटण हॉकी संघटना व छावा स्पोर्टस् यांच्यात झाला. हा सामना छावा संघाने ६-० असा जिंकत स्पर्धेची पुढील फेरी गाठली.