शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून बारावीची परीक्षा, भरारी पथकांची राहणार नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 11:31 IST

कोरोना, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी बारावीची परीक्षा ऑफलाईन स्वरूपात

कोल्हापूर : कोरोना, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी बारावीची परीक्षा ऑफलाईन स्वरूपात होणार आहे. या परीक्षेची सुरुवात आज, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता इंग्रजी विषयाच्या पेपरने होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २९१ केंद्रांवर एकूण ५२,८२२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाने परीक्षा तयारी पूर्ण केली आहे. यावर्षी महाविद्यालय तेथे परीक्षा केंद्र असणार आहे. विद्यार्थी संख्या अधिक असलेल्या महाविद्यालयांत पर्यवेक्षक जादा लागणार आहेत. त्यादृष्टीने गेल्या दोन दिवसांपासून महाविद्यालयांची तयारी सुरू आहे. समुपदेशक नियुक्ती, हेल्पलाईनची सुविधा, उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचविणे, आदी स्वरूपातील तयारी शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने पूर्ण केली असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष सत्यवान सोनवणे यांनी दिली.विद्यार्थ्यांनी किमान एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आणि मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, परीक्षा कक्षांची स्वच्छता, सॅनिटायझेशन आणि बेंचवर बैठक क्रमांक नोंदविण्याचे काम महाविद्यालयांत गुरुवारी करण्यात आले. आवश्यक सूचना महाविद्यालयांनी नोटीस फलकावर लावल्या आहेत. त्याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने अभ्यासाची उजळणी करण्यात विद्यार्थी मग्न झाले होते.

सात भरारी पथकांची राहणार नजरपरीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून सात भरारी पथके कार्यान्वित असणार आहेत. कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या दक्षता समितीच्या बैठकीतील सूचनांनुसार कार्यवाही करण्याबाबत शिक्षण विभागाने महाविद्यालयांना कळविले आहे. त्यात तालुकास्तरीय बैठे पथकातील कर्मचारी ज्या गावात कार्यरत अथवा रहिवासी आहेत. त्यांची त्यांच्या गावात नियुक्ती करण्यात येऊ नये. पर्यवेक्षकांच्या नेमणुका त्यांच्या शाळा, महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रावर न करता साखळी पद्धतीने नजीकच्या केंद्रावर करावी, आदी सूचनांचा समावेश आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थी