‘स्थायी’साठी शुक्रवारी मुलाखती

By Admin | Updated: December 15, 2014 23:59 IST2014-12-15T23:39:04+5:302014-12-15T23:59:02+5:30

महानगरपालिका : सभापतिपदी फरास किंवा पुरेकर निश्चित

Friday Interviews for 'Permanent' | ‘स्थायी’साठी शुक्रवारी मुलाखती

‘स्थायी’साठी शुक्रवारी मुलाखती

कोल्हापूर : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. तत्पूर्वी, समितीमधून निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांची निवड शनिवारी (दि. २०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील चार जागी स्थायी समिती सदस्यांसाठी इच्छुकांच्या मुलाखती शुक्रवारी (दि. १९) होणार आहेत. तत्पूर्वी, कॉँग्रेस, जनसुराज्य, शिवसेना, भाजप व शिवसेना हे प्रत्येकी एक नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. स्थायी सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक आदिल फरास व जनसुराज्यच्या मृदुला पुरेकर हे प्रमुख दावेदार मानले जातात.
स्थायी समिती सभापती, परिवहन समितीसह महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांसह सभापतीची नव्याने निवड होणार आहे. त्यामध्ये चार काँग्रेस, तीन राष्ट्रवादी, जनसुराज्य, सेना-भाजप प्रत्येकी एक याप्रमाणे सदस्य निवड केली जाणार आहे. आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी दहा महिन्यांसाठी महापौरपद कॉँग्रेसकडे राहणार आहे, तर महापालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या जोडीला महिला व बालकल्याण समिती राष्ट्रवादीकडे असणार आहे.
राजू घोरपडे, राजू लाटकर, महेश गायकवाड, सुनील पाटील, सतीश लोळगे, यशोदा मोहिते, राजू हुंबे व सुभाष रामुगडे या आठ स्थायी समिती सदस्यांची मुदत २० डिसेंबरला संपत आहे. यादिवशी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नव्या सदस्यांची निवड किंवा आहे त्या सदस्यांना मुदतवाढ दिली जाणार आहे. तसेच नव्या वर्षात परिवहन समिती सभापती वसंत कोगेकर, राजाराम गायकवाड, रेखा पाटील, स्मिता माळी, रेखा आवळे, सतीश लोळगे यांच्या जागी नवीन सदस्यांची वर्णी लागणार आहे. निवडणुकीपूर्व किमान समिती सदस्य किंवा सभापतिपदी वर्णी लावण्यासाठी अनेकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Friday Interviews for 'Permanent'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.