आनंद गौरव पुरस्काराचे शुक्रवारी वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST2021-09-22T04:28:48+5:302021-09-22T04:28:48+5:30
इचलकरंजी : श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाच्यावतीने गुरुदेव राष्ट्रसंत आचार्य भगवंत आनंदऋषीजी म. साब यांच्या जयंतीनिमित्त विविध ...

आनंद गौरव पुरस्काराचे शुक्रवारी वितरण
इचलकरंजी : श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाच्यावतीने गुरुदेव राष्ट्रसंत आचार्य भगवंत आनंदऋषीजी म. साब यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना आनंद गौरव पुरस्कार २०२१ ने सन्मानित केले जाणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि.२४) सकाळी ८.३० वाजता महावीर जैन भवन येथे कोरोना नियमांचे पालन करून मोजक्या उपस्थित होणार आहे, अशी माहिती श्रीकांत चंगेडिया यांनी दिली आहे. जीवनराज पूनमियॉँ (उद्योग), पद्मजा चंगेडिया (धार्मिक), प्रितम बोरा (सामाजिक), हेमा चोपडा (कला), तर डॉ. महेश गांधी व चिराग बाबेल यांचा गौरव करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थान नगरसेवक मदन कारंडे भूषविणार आहेत. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व पुणे महापालिकेचे नगरसेवक प्रवीण चोरबेले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.