आजच्या पिढीसमोर स्वातंत्र्य लढा पुन्हा जिवंत झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:22 IST2021-03-28T04:22:15+5:302021-03-28T04:22:15+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १९४२ च्या स्वातंत्र्य लढा ‘१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार’ या पुस्तक रुपाने शरद ...

The freedom struggle was revived before today's generation | आजच्या पिढीसमोर स्वातंत्र्य लढा पुन्हा जिवंत झाला

आजच्या पिढीसमोर स्वातंत्र्य लढा पुन्हा जिवंत झाला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १९४२ च्या स्वातंत्र्य लढा ‘१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार’ या पुस्तक रुपाने शरद तांबट यांनी युवा पिढीसमोर आणत इतिहास पुन्हा जिवंत केला. असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. स्वातंत्र्यलढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व्हिनस काॅर्नर येथील लोटस प्लाझा येथे शनिवारी आयोजित केलेल्या ‘१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार’ या पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, ब्रिटिशांना ‘चले जाव’ चा नारा देत १९४२ साली युवकांनी महाविद्यालयात जाण्याऐवजी तुरुंगात जाणे पसंत केले. या त्यांच्या त्यागामुळेच आजचे हे चांगले दिवस आपल्याला पाहण्यास मिळत आहेत. त्या काळचा विल्सन यांचा पुतळा काढून त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचे महत्त्वाचे स्वातंत्र्य सैनिकांनी केले. हा इतिहास ही या पुस्तक रुपाने युवा पिढीसमोर आला आहे. हा निश्चितच अभ्यासण्यासारखा आहे. स्वातंत्र्यसेनानींची नावे कायम चिरस्मरणात राहण्यासाठी वर्दळीच्या चौकात नावे असलेली शिळा उभी करू. त्या रुपाने ही नावे आजच्या व उद्याच्या पिढीला कायम लक्षात राहतील. अशी ग्वाही दिली.

रजनीताई मगदूम म्हणाल्या, वडील रत्नाप्पाआण्णा यांच्याकडे आम्ही लहान असताना येणाऱ्या थोर स्वातंत्र्य सैनिकांचे चेहरे या पुस्तक प्रकाशनानिमित्त पुन्हा समोर आले आणि हा इतिहास ताजा झाला.

लेखक शरद तांबट म्हणाले, १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील इतिहास पुस्तक रुपाने आजच्या पिढीसमोर आणला आहे. परिपूर्ण करून तो समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. स्वागत चेंबर ऑफ काॅमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने व प्रास्ताविक अनिल घाटगे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, खेलो इंडिया (नवी दिल्ली) चे संचालक सतीश बागल, आर.डी.पाटील, रावसाहेब पाटील या प्रमुख मान्यवरांसह स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : २७०३२०२१-कोल-शरद पुस्तक प्रकाशन

ओळी : स्वातंत्र्यलढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शरद तांबट यांनी ‘१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार ’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आण्णासाहेब गाठ, वसंतराव मुळीक, सतीश बागल, रजनीताई मगदूम, आर.डी.पाटील, आनंद माने, शरद तांबट,अनिल घाटगे, रावसाहेब पाटील, उपस्थित होते.

===Photopath===

270321\27kol_1_27032021_5.jpg

===Caption===

फोटो : २७०३२०२१-कोल-शरद पुस्तक प्रकाशन आेळी : स्वातंत्र्यलढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शरद तांबट यांनी ‘१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार ’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आण्णासाहेब गाठ, वसंतराव मुळीक, सतीश बागल, रजनीताई मगदूम, आर.डी.पाटील, आनंद माने, शरद तांबट,अनिल घाटगे, रावसाहेब पाटील, उपस्थित होते.  

Web Title: The freedom struggle was revived before today's generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.