शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यसैनिक बाबूराव हासुरे यांचे निधन, कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 16:11 IST

१९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिगत राहून देशासाठी त्यांनी काम केले होते

कसबा सांगाव : कसबा सांगाव येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबूराव पिरगोंडा हसुरे (वय ९६) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार रूपाली सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशीलकुमार संसारे यांनी शासनाच्या वतीने आदरांजली वाहिली. जि. प. सदस्य युवराज पाटील यांनीही पार्थिवाचे दर्शन घेतले.१९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिगत राहून देशासाठी त्यांनी काम केले होते. सरकारी चावडी, पोस्ट ऑफिस जाळणे, टेलिफोनच्या तारा तोडून दळणवळणामध्ये अडचणी निर्माण करणे, या कार्यामध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. कसबा सांगाव गावालगत महाराणी इंदुमती पार्क येथे इंग्रज अधिकारी वापरत असलेला बंगला जाळून टाकण्यात त्यांचा सहभाग होता. गारगोटी येथील सरकारी खजिना व हत्यारे लुटीमध्ये ते सहभागी होते.भारत छोडो, चले जाव आंदोलनांमध्ये अहिंसा तत्त्वावर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, नागनाथअण्णा नायकवडी, दादासाहेब मगदूम, शिवराम मर्दाने या स्वातंत्र्यसैनिकांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यरत होते.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गावातील विविध संस्था स्थापनेत त्यांचा सहभाग होता. त्यांनी कोल्हापूर जिल्हा स्वातंत्रसैनिक संघटना, जिल्हा खादी ग्रामोद्योग समिती व दादासाहेब मगदूम स्मारक समितीमध्ये संचालक म्हणून काम केले आहे. ते कुमार विद्यामंदिर शाळेचे चेअरमन म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर