विद्या प्रबोधिनीमार्फत मोफत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:30 IST2021-07-07T04:30:54+5:302021-07-07T04:30:54+5:30
कोल्हापूर : ‘विद्या प्रबोधिनी’ रोजगार व मार्गदर्शन केंद्र आणि श्री इंडस्ट्रीज वाय. पी. पोवारनगर यांच्यामार्फत मोफत सीएनसी आणि व्हीएमसी ...

विद्या प्रबोधिनीमार्फत मोफत प्रशिक्षण
कोल्हापूर : ‘विद्या प्रबोधिनी’ रोजगार व मार्गदर्शन केंद्र आणि श्री इंडस्ट्रीज वाय. पी. पोवारनगर यांच्यामार्फत मोफत सीएनसी आणि व्हीएमसी प्रशिक्षणाची सुरवात करण्यात आली. विद्या प्रबोधनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांचे हस्ते या वाय. पी. पोवारनगर येथे प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले.
औद्योगिक क्षेत्रांमध्ये कोणकोणत्या नवनवीन संधी आहेत, तसेच या प्रशिक्षणादरम्यान वर्कशॉपमध्ये कोणत्या पद्धतीची काळजी घ्यावी, याबाबत श्री इंडस्ट्रीजचे आनंद पेंडसे यांनी माहिती दिली. त्याचबरोबर सीएनसी आणि व्हीएमसी ट्रेनिंगचे प्रशिक्षक संतोष परीट यांनी प्रशिक्षणामध्ये कोण कोणत्या पद्धतीचे शिक्षण व प्रात्यक्षिक असेल, शहर व ग्रामीण परिसरातील २५ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवला. विजयसिंह पाटील, जयदीप मोरे, गजानन तुळजन्नवर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.