शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

उद्योग वाचविण्यासाठी मुक्त वीज वापर धोरण हवे, औद्योगिक संघटना आग्रही 

By संदीप आडनाईक | Updated: April 20, 2023 19:02 IST

राज्यातील उद्योगांचा स्पर्धात्मक दर्जा इतर राज्यांच्या तुलनेत यामुळेच घसरला

संदीप आडनाईककोल्हापूर : महावितरणने केलेली प्रस्तावित वीज दरवाढ अन्यायकारक आहे. इतर राज्यांचा विचार करता या दरवाढीने उद्योगांचे कंबरडे मोडणार आहे. राज्यातील उद्योगांचा स्पर्धात्मक दर्जा इतर राज्यांच्या तुलनेत यामुळेच घसरला आहे. म्हणूनच मुक्त वीज वापराचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा आग्रह कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कागल आणि आयआयएफ या औद्योगिक संघटनांनी सरकारकडे केला आहे.

महावितरणच्या कार्यप्रणालीत बदल होत नाही. सातत्याने दरवाढीचा बडगा उद्योजकांवर उगारला जातो. उद्योग वाचवायचे असतील तर केवळ महावितरणवर अवलंबून न राहता अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांबरोबरच इतर पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक निर्णय त्वरित घेणे अत्यावश्यक आहे.  - सचिन शिरगावकर (अध्यक्ष, आयआयएफ)  

मुक्त वीज म्हणजेच ओपन एक्सेसचा गेल्या उद्योग धोरणात समावेश होता. मात्र ते धोरण कार्यान्वित झाले नाही. फक्त वहन व पारेषण खर्चाच्या व्यतिरिक्त कोणताही आकार/अधिभार अथवा क्रॉस सबसिडी न लावता सर्व उद्योगांना मुक्त वीज वापराची परवानगी दिल्यास खासगी पुरवठादारांकडून स्वस्त दरात वीज मिळेल आणि शासनास तीन रुपये प्रतियुनिटप्रमाणे अनुदान द्यावे लागणार नाही. याचा लाभ सूतगिरण्यांनाही मिळू शकतो. - संजय शेटे (अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स)  

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपैकी सौर आणि पवन ऊर्जेपासून निर्माण झालेली वीज ही महावितरणच्या विजेमध्ये समायोजित करून लोड फॅक्टर इन्सेटिव्ह दिल्यास आर्थिकदृष्ट्या अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत फायदेशीर ठरू शकेल. या माध्यमाचा राज्यातील उद्योग अंशत: वापर करण्यास उत्सुक राहतील. - हर्षद दलाल (चेअरमन, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन)  

रुफटॉफ वीजनिर्मितीची ९९९ किलोवॉटची मर्यादा त्वरित रद्द केली पाहिजे. आपारंपरिक स्त्रोतांपासून निर्माण होणारी वीज ही महावितरणच्या वीजबिलात समायोजित करून लोड फॅक्टर इन्सेटिव्ह दिली जाऊ शकते. रुफटॉफ सोलरच्या माध्यमातून उद्योगांच्या छतावर प्रचंड मोठी वीजनिर्मिती होऊ शकते. यासाठी ऊर्जा धोरणात बदल झाला पाहिजे. उद्योगांना मेडाच्या माध्यमातून अनुदान द्यावे तसेच केंद्राच्या मदतीने वीजनिर्मितीचे प्रकल्प उभे करणाऱ्या सर्वच उद्योगास कमी व्याज दराने भांडवल दिले जावे. - दीपक चोरगे (गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन)  

औद्याेगिक धोरणाप्रमाणे वर्गीकरण केलेल्या मागास आणि अतिमागास म्हणजेच डी आणि डी प्लस विभागास विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे कायमस्वरूपी वीज शुल्क आकारणी होऊ नये. यामुळे उर्वरित महाराष्ट्रामध्ये उत्पादन खर्च एकसारखा राहील आणि तेथील मागासलेल्या विभागातील उद्योगांना आधार मिळेल. - दीपक पाटील (शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) 

महावितरणने मागणी केलेल्या दोन महिन्यांच्या वीजबिलांइतकी सुरक्षा ठेव देणे उद्योगांना अशक्य आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे सर्व उद्योगांना प्रीपेड मीटर सुविधा उपलब्ध करून दिल्यास आणि या मीटरची व्यवस्था केल्यास सुरक्षा ठेव देण्याची गरज भासणार नाही आणि वीजबिलामध्ये ५ टक्के अतिरिक्त सवलत मिळेल. - हरिश्चंद्र धोत्रे (अध्यक्ष, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कागल) 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीज