गरजू रुग्णांना मोफत ‘ऑक्सिजन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST2021-05-01T04:23:29+5:302021-05-01T04:23:29+5:30

ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन मणेर मस्जीद ट्रस्टने गरजू रुग्णांना ...

Free oxygen to needy patients | गरजू रुग्णांना मोफत ‘ऑक्सिजन’

गरजू रुग्णांना मोफत ‘ऑक्सिजन’

ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन मणेर मस्जीद ट्रस्टने गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर देण्याचा उपक्रम गेल्या दीड आठवड्यापासून सुरू केला. आतापर्यंत या ट्रस्टने कोल्हापूर शहर, गिरगाव, मुरगुड, किसरुळ, कसबा सांगाव आदी परिसरातील १० रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरची मदत केली आहे. या रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळाल्याने त्यांना मोठी मदत झाली आहे.

दरम्यान, या उपक्रमाबाबत ट्रस्टचे विश्वस्त हिदायत मणेर यांनी सांगितले की, रुग्णांना सध्या असलेली ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन ट्रस्टने हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये १५ हजार रुपयांचे ऑक्सिजन सिलिंडर गरजू रुग्णांना मोफत देण्यात येत आहे. त्यासाठी रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. गरज असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना मदत केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत या ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गरजूंनी ९४२३२७६८३३ अथवा ९८९०६८१९९९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

फोटो (३००४२०२१-कोल-मणेर मस्जिद ०१ व ०२)

कोल्हापुरातील शनिवार पेठ परिसरातील मणेर मस्जीद ट्रस्टने गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

===Photopath===

300421\30kol_8_30042021_5.jpg~300421\30kol_9_30042021_5.jpg

===Caption===

फोटो (३००४२०२१-कोल-मणेर मस्जिद ०१ व ०२) : कोल्हापुरातील शनिवार पेठ परिसरातील मणेर मस्जीद ट्रस्टने गरजू रूग्णांना मोफत ऑक्सिजन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.~फोटो (३००४२०२१-कोल-मणेर मस्जिद ०१ व ०२) : कोल्हापुरातील शनिवार पेठ परिसरातील मणेर मस्जीद ट्रस्टने गरजू रूग्णांना मोफत ऑक्सिजन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

Web Title: Free oxygen to needy patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.