शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
2
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
3
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
4
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
5
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
6
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
7
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
8
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
9
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
10
संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ
11
Astro Tips: 'या' उपायामुळे सोमवार २१ एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो!
12
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
13
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार
14
‘२.५ कोटी रुपये पगार असावा आणि...!’ भावी नवऱ्याकडून तरुणीच्या अपेक्षांची मोठी लिस्ट, व्हायरल पोस्ट चर्चेत
15
IPO आणण्याच्या तयारीत PhonePe, नावही बदललं; भारतात लिस्टिंगच्या तयारीला वेग
16
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
17
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
18
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
19
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका

Kolhapur: रहदारीचा रस्ता बंद असल्याने वन्यजिवांचा मुक्त संचार, दाजीपूर अभयारण्यातील प्राण्यांचे स्थानिकांना दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:27 IST

गौरव सांगावकर राधानगरी : मागील महिन्यापासून राधानगरी-दाजीपूर रस्ता दुरुस्तीचे काम चालू असल्याने या मार्गांवरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली ...

गौरव सांगावकरराधानगरी : मागील महिन्यापासून राधानगरी-दाजीपूर रस्ता दुरुस्तीचे काम चालू असल्याने या मार्गांवरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. या ४० दिवसांच्या कालावधीत अभयारण्यातील वन्यजीव निर्भयपणे या मार्गावर मुक्त संचार करू शकले. वाहनांची वर्दळ, कर्कश आवाज, हॉर्न यापासून प्राण्यांना काही काळ दिलासा मिळाला. यामुळे राधानगरी-दाजीपूर रस्त्यावर स्थानिकांना वन्यजिवांचा मुक्तपणे संचार होत असल्याचे दिसून येत आहेत.यामध्ये भेकर, साळिंदर, अजगर, अस्वल, बिबट्या, गवे, रानडुकरे, खवल्या मांजर, कोल्हे या प्राण्यांसह रानकोंबड्या, पन्ना कबूतर, सर्प गरुड, घुबड, हॉर्नबिल, स्वर्गीय नर्तक या पक्ष्यांचा रस्त्यावर मुक्त संचार आढळून आला. ३५१.१६ चौरस किलोमीटर क्षेत्र असणाऱ्या दाजीपूर अभयारण्यातील इदरगंज पठारपासून सुरंगी ते काळम्मावाडी या क्षेत्रालगत हा रस्ता असल्याने या क्षेत्रातील प्राणी मुख्य रस्त्यावर निर्भयपणे फेरफटका मारू शकले.दाजीपूर अभयारण्यातील हेच प्राणी पाहण्याकरिता पर्यटकांना अभयारण्य क्षेत्रात फिरावे लागते, पण आत्ता याच प्राण्याचे दर्शन स्थानिकांना सहजरीत्या घेता आले. यामुळे राधानगरी अभयारण्यातील गव्यांसोबत इतर दुर्मीळ वन्यजीवही दृष्टीस पडले.

या मार्गावरील वाहतूक चालू झाल्यानंतर पर्यटकांनी वाहनांचा हॉर्न, वेगावर नियंत्रण ठेवल्यास या वन्यजिवांना अभय मिळेल. तसेच हे दुर्मीळ प्राणी आपणासही सहज पाहता येतील  - रुपेश बोंबडे, उपाध्यक्ष बायसन नेचर क्लब, राधानगरी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलAnimalप्राणी