शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील सीपीआरमध्ये मोफत लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया, प्रसिद्ध सर्जन डॉ. लकडावाला यांच्यावर जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:05 IST

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध रोबोटिक व लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ.मुफ्फझल लकडावाला हे सीपीआरमध्ये हर्निया, अपेंडिक्स, ...

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध रोबोटिक व लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ.मुफ्फझल लकडावाला हे सीपीआरमध्ये हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय तसेच गर्भाशयावरील मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत. संबंधित रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी नोंदणी करावी असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे.या अनुषंगाने शेंडा पार्क येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. संजय रणवीर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.लॅपरोस्कोपीक शस्त्रक्रिया ही विनाछेद शस्त्रक्रिया असून यामध्ये कुठल्याही प्रकारची शरीराची चिरफाड न करता शस्त्रक्रिया केली जाते. पहिल्या टप्प्यात ५० शस्त्रक्रिया होणार आहेत. यानंतर रुग्णसंख्येचा विचार करून पुढचे शिबिर घेण्यात येईल. ज्या रुग्णांना हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय तसेच गर्भाशय याबाबतची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी तातडीने सीपीआर ओपीडी खोली क्रमांक १०७, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नाव नोंदणी करण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.

डॉ. लकडावालांनी ५० हजारांहून अधिक शस्त्रक्रिया केल्याडॉ. लकडावाला हे डॉ. मुफी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते भारतातील प्रसिद्ध लॅपरोस्कोपिक सर्जन आहेत. बॅरिएट्रिक आणि गॅस्ट्रो-इंटेस्टाइनल शस्त्रक्रियांमध्ये तेे विशेषज्ञ असून ते डायजेस्टिव्ह हेल्थ इन्स्टिट्यूटचे सह-संस्थापक आणि मुख्य शल्यचिकित्सक आहेत. भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ५० हजारांहून अधिक जीव वाचवणाऱ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयHasan Mushrifहसन मुश्रीफ