के.एम.टी.च्या नव्या बसेसचा मार्ग मोकळा

By Admin | Updated: November 24, 2014 23:59 IST2014-11-24T23:34:08+5:302014-11-24T23:59:38+5:30

महापालिका : टाटा मोटर्सची याचिका बेदखल

Free the KMC's new buses | के.एम.टी.च्या नव्या बसेसचा मार्ग मोकळा

के.एम.टी.च्या नव्या बसेसचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन विभागाकडे (के.एम.टी.) घेण्यात येणाऱ्या १०४ बसेसच्या निविदा प्रक्रिये विरोधात टाटा मोटर्सने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बेदखल केली आहे. त्यामुळे के.एम.टी.च्या ताफ्यात जानेवारी महिन्यात पहिल्या टप्प्यातील २५ नव्या बसेस येण्याचा मार्ग खुला झाला आहे.
केंद्र सरकारने के.एम.टी.ला १०४ नव्या बसेस घेण्यासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर केला. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीच के.एम.टी. प्रशासनाने बसेस खरेदीकरिता निविदा मागविल्या होत्या. पहिल्यांंदा काढलेली ही निविदा ३२ प्रवासी क्षमता असलेल्या लहान व तांत्रिकदृष्ट्या सक्षम बसेस खरेदीसाठी रद्द करण्यात आली. त्यानंतरच्या फेरनिविदेत टाटा मोटर्स (२४.७२ लाख), अशोक लेलँड (२४.६३ लाख) व व्ही. व्ही. मर्शियल व्हेईकल्स (२५.२२ लाख) (कंसातील दर प्रतिबसप्रमाणे) बसेस पुरवठा करण्यास पात्र ठरल्या. सर्वांत कमी निविदा दर आलेल्या अशोक लेलँड कंपनीला आयुक्तस्तरावर आणखी दर कमी करण्यासंदर्भात चर्चेला पाचारण करून त्यांची निविदा मंजूर केली.
त्यानंतर या प्रक्रीयेविरोधात टाटा मोटर्सने के.एम.टी. प्रशासनास न्यायालयात खेचले. न्यायालयात के.एम.टी.ने म्हणणे सादर केले त्यानंतर न्यायालयाने टाटा मोटर्सची याचिका रद्दबादल ठरविल्याचे सूत्रांनी सांगितले. नव्या बसेसच्या खरेदीचा मार्ग मोकळा झाल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Free the KMC's new buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.