शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

corona virus Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश शहरांत मोफत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:09 AM

corona virus Kolhapur : कोरोनाच्या काळात व एरव्हीही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत महापालिका व नगरपालिकांकडून मृतांवर मोफत अंत्यसंस्काराची सोय उपलब्ध करून दिली आहे. मोफत अंत्यसंस्काराचा मूळ पॅटर्न कोल्हापूर शहराचा घालून दिला आहे. त्याचे अनुकरण गेल्या काही वर्षांत अनेक शहरांत होत असल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देपश्चिम महाराष्ट्रात बहुतांश शहरांत मोफत अंत्यसंस्कार कोल्हापूर पॅटर्न : नगरपालिका मात्र आकारतात शुल्क

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोरोनाच्या काळात व एरव्हीही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत महापालिका व नगरपालिकांकडून मृतांवर मोफत अंत्यसंस्काराची सोय उपलब्ध करून दिली आहे. मोफत अंत्यसंस्काराचा मूळ पॅटर्न कोल्हापूर शहराचा घालून दिला आहे. त्याचे अनुकरण गेल्या काही वर्षांत अनेक शहरांत होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचा कहर माजला असताना मृत्यूंची संख्याही रोज वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मृतांवरील अंत्यसंस्काराची प्रमुख शहरात काय व्यवस्था आहे, हे ह्यलोकमतह्णने जाणून घेतले. त्यामध्ये दिलासा देणारे चित्र पुढे आले.जन्म कुठेही व्हावा; परंतु अंत्यसंस्कारासाठी मात्र कोल्हापुरात यावे असे म्हटले जाते. कारण गेली अनेक वर्षे कोल्हापुरात मोफत अंत्यसंस्काराची सोय आहे. दीपक पोलादे या सामाजिक कार्यकर्त्याने ॲल्युमिनियमच्या कमी वजनाच्या २० तिरडी, फायबरच्या पिंडी, तांब्याचे कलश व एक टन रक्षा मावेल एवढ्या आकाराचे दोन ठिकाणी रक्षाकुंड दिले आहेत.

पूर्वी तिरडीसाठी बांबू विकत आणावे लागत होते. त्यातून निसर्गाची हानी होते म्हणून तिरडीच्या वापरासाठी पोलादे यांनी प्रबोधनाची मोहीम राबवली व त्याला चांगले यश आले आहे. त्यामुळेच कोल्हापूरने मोफत अंत्यसंस्कारासह आता पर्यावरणपूरक रक्षाविसर्जनाचे पुढचे पाऊल टाकले आहे. कोल्हापूरसह, सांगली, सातारा, पुणे व पिंपरी-चिंचवडला मोफत अंत्यसंस्काराची सोय आहे. इस्लामपूर, कराड, रत्नागिरी नगरपालिकांसह इतरही काही नगरपालिका अंत्यसंस्कारासाठी पैसै आकारतात.कोल्हापूर महापालिका :

  • अंत्यसंस्कार सेवा : मोफत
  • एकूण स्मशानभूमी : ०४
  • महिन्याला अंत्यसंस्कार : ३५०
  • सध्या कोविड मृत्तांवर मुख्यत : डिझेल दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार
  • महापालिकेचा वाषिर्क खर्च : ३५ लाख

सांगली-मिरज-कूपवाड महापालिका :

  • अंत्यसंस्कार सेवा : मोफत
  • एकूण स्मशानभूमी : ०५
  • महिन्याला अंत्यसंस्कार : २१०
  • कूपवाडला गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार
  • कोविड मृतांसाठी पंढरपूर रोडला स्वतंत्र स्मशानभूमी
  • महापालिकेचा वार्षिक खर्च : ६० लाख

इस्लामपूर नगरपालिका :

  • अंत्यसंस्कार सेवा : सशुल्क
  • एकूण स्मशानभूमी : ०१
  • महिन्याला अंत्यसंस्कार : ७६
  • विद्युत दाहिनीचे शुल्क : २१००
  • पारंपरिक अंत्यसंस्कार : नातेवाइकांनी स्वत: लाकूड-शेणीची व्यवस्था करायची.
  • नगरपालिकेचा वार्षिक खर्च : गरज पाहून तरतूद

 

सातारा नगरपालिका :

  • अंत्यसंस्कार सेवा : मोफत
  • एकूण स्मशानभूमी : ०२
  • महिन्याला अंत्यसंस्कार : १७५
  • महापालिकेचा वार्षिक खर्च : २५ लाख
  • नगरपालिकेच्या आवाहनानंतर १६८ लोकांनी कोविड मृताच्या अंत्यसंस्कारासाठी ३८०० रुपयांप्रमाणे पैसे स्वत:हून दिले.
  • सातारा पालिकेने आतापर्यंत १९०० कोविड मृतांवर केले अंत्यसंस्कार.

 

कराड नगरपालिका :

  • अंत्यसंस्कार सेवा : सशुल्क
  • एकूण स्मशानभूमी : ०१
  • महिन्याला अंत्यसंस्कार : ८०
  • नगरपालिकेचा वार्षिक खर्च : तरतूद नाही
  • शहराबाहेरील कोविड मृतांच्या नातेवाइकांकडून ५५०० व दफनसाठी १०५०० शुल्क
  • इतरवेळी : नातेवाइकांनी अंत्यसंस्काराचा खर्च स्वत:च करायचा.

 

पुणे महापालिका :

  • अंत्यसंस्कार सेवा : मोफत
  • एकूण स्मशानभूमी : १० त्याशिवाय विद्युत ११ व गॅस दाहिन्या : १३
  • महिन्याला होणारे अंत्यसंस्कार : १७०० पर्यंत
  • महापालिकेचे स्मशानभूमीसाठी वार्षिक तरतूद : ७५ लाख

पिंपरी चिंचवड महापालिका

  • अंत्यसंस्कार सेवा : सशुल्क
  • एकूण स्मशानभूमी : १६
  • महिन्याला अंत्यसंस्कार : १२५ हून जास्त
  • नगरपालिकेचा वार्षिक खर्च : स्वतंत्र तरतूद नाही
  • कोविड रुग्णांसाठी आता महापालिका प्रत्येकी ८ हजार खर्च करते.
  • इतर लोकांचे अंत्यसंस्कार नातेवाइकांनी स्वत: लाकूड-शेणी आणून करण्याची सोय.

 

रत्नागिरी नगरपालिका :

  • अंत्यसंस्कार सेवा : सशुल्क
  • एकूण स्मशानभूमी : ०३
  • महिन्याला अंत्यसंस्कार : ३०
  • नगरपालिकेचा वार्षिक खर्च : १५ लाख
  • कोविड रुग्णांसाठी मोफत उपचार
  • इतर रुग्णांकडून दहन असेल तर प्रत्येकी १ हजार व विद्युतदाहिनी असेल तर ५०० रुपये शुल्क

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूMuncipal Corporationनगर पालिका