२०० कोरोनाबाधित रुग्णांना मोफत अन्नछत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST2021-05-20T04:25:32+5:302021-05-20T04:25:32+5:30

गारगोटी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.या सर्व रुग्णांना सकस व पोषक आहाराची व्हेज ...

Free food umbrella for 200 coronary artery patients | २०० कोरोनाबाधित रुग्णांना मोफत अन्नछत्र

२०० कोरोनाबाधित रुग्णांना मोफत अन्नछत्र

गारगोटी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.या सर्व रुग्णांना सकस व पोषक आहाराची व्हेज बिर्याणी मोफत जागापोहोच देण्याचा उपक्रम आदमापूर (ता. भुदरगड) च्या सद्गुरू बाळूमामा फौंडेशनचे अध्यक्ष सरपंच विजय गुरव यांनी सुरू केला आहे. कोविड सेंटर चालू असेपर्यंत हा अन्नदानाचा उपक्रम असाच चालू राहणार असल्याचे सरपंच गुरव यांनी सांगितले.

या स्तुत्य उपक्रमासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती मदतीचा हात देत असून दरदिवशी एक देणगीदार यासाठी येणाऱ्या खर्चापोटी तीन हजार रुपयांची देणगी देत असतो. रोज सकाळी ८.३० च्या नाष्ट्याला तूप काजूगर, भाजीपाला अशा अत्यंत सकस व पौष्टिक पदार्थांनीयुक्त अशी ही व्हेज बिर्याणी गारगोटी कोविड सेंटरला उपचार घेत असलेल्या सुमारे २०० रुग्णांना रोज मोफत दिली जाते. या अन्नदानामुळे या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.या दातृत्वाबद्दल भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी आडसूळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Free food umbrella for 200 coronary artery patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.