ग्रामपंचायतीने कोविड सेंटर सुरू केल्यास रुग्णांना मोफत जेवण : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:11+5:302021-06-01T04:18:11+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनास सात वर्षे पूर्ण झालेबद्दल भुदरगड तालुक्यातील खानापूर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व ...

Free food for patients if Gram Panchayat starts Kovid Center: Patil | ग्रामपंचायतीने कोविड सेंटर सुरू केल्यास रुग्णांना मोफत जेवण : पाटील

ग्रामपंचायतीने कोविड सेंटर सुरू केल्यास रुग्णांना मोफत जेवण : पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनास सात वर्षे पूर्ण झालेबद्दल भुदरगड तालुक्यातील खानापूर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व कोरोना योद्ध्यांच्या सत्कार कार्यक्रमप्रसंगी बोलतांना दिली. जिल्हा उपाध्यक्ष प्रविणसिंह सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

ते पुढे बोलताना म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ग्रामपंचायतीनी कोविड सेंटर सुरू करावीत. रुग्णांना जेवण, नाष्टा बचतगटामार्फत पुरविल्यास जेवण व औषधांची व्यवस्था करू, असे आश्‍वासन दिले. या वेेळी कोरोना योद्ध्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार, तसेच नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या वेळी नाथाजी पाटील, संदीप पाटील, सुशांत मगदूम, दत्‍तात्रय पाटील, सुभाष पाटील, सागर नाईक, संजय रेडेकर, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष पार्थ सावंत, माजी सरपंच विद्या सावंत, तृप्ती पुजारी, शोभा मांगले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ

जीवनावश्यक वस्तू वाटप करताना आ. चंद्रकांत पाटील, सोबत प्रविणसिंह सावंत, विद्या सावंत, पार्थ सावंत, सुशांत मगदूम आदी.

Web Title: Free food for patients if Gram Panchayat starts Kovid Center: Patil