कागलमध्ये मोफत दवाखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST2021-05-24T04:22:42+5:302021-05-24T04:22:42+5:30

कागल : येथील मुस्लिम समाजाच्या बैतुलमाल समितीने नगरपरिषदेच्या परवानगीने प्राथमिक धर्मादाय दवाखाना सुरू केला आहे. कोरोनाच्या ...

Free clinic in Kagal | कागलमध्ये मोफत दवाखाना

कागलमध्ये मोफत दवाखाना

कागल : येथील मुस्लिम समाजाच्या बैतुलमाल समितीने नगरपरिषदेच्या परवानगीने प्राथमिक धर्मादाय दवाखाना सुरू केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य लोकांना किरकोळ आजारावर मोफत उपचार मिळावेत हा या उपक्रमाचा उद्देश आहे. येथील मुजावर गल्लीत शाहू सभागृहाजवळ हा दवाखाना आहे.

मोफत तपासणी आणि प्राथमिक औषधे देण्यात येत आहेत. यासाठी समितीला अनेकजण मदतही करीत आहेत. रविवारी ॲस्टर आधार रुग्णालयाच्या डाॅ. आयेशा राऊत यांनी अंदाजे पंचवीस हजार रुपयांची औषधे दवाखान्याला प्रदान केली. यावेळी गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ, डाॅ. सुरेश दाभाडे, बैतुलमाल समितीचे जमीर नाईक, हाजी मुनीर मुल्ला, डाॅ. नासीर नाईक, नासीर मुल्ला, आदी उपस्थित होते. या दवाखान्यासाठी डाॅ. इर्षाद काझी, सुरेश दाभाडे, शब्बीर मुजावर हे सध्या मोफत सेवा बजावीत आहेत. गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.

चौकट

"कोरोना महामारीमुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. दवाखान्यात जाऊन उपचार घेणे लोक टाळत आहेत. शंभर-दोनशे रुपयेही खर्च करणे सामान्य माणसांना परवडत नाही. सरकारी दवाखान्याची यंत्रणाही कोविडच्या मागे लागली आहे. लोक आजार अंगावर काढत आहेत. म्हणून हा मोफत प्राथमिक दवाखाना सुरू केला आहे. याशिवाय विविध रक्त-लघवी, कोविड यासारख्या विविध तपासण्या नाममात्र दरात करून देण्यासाठी ही यंत्रणा निर्माण केली आहे. - जमीर नाईक, बैतुलमाल समिती कागल

छायाचित्र.

कागल येथे बैतुलमाल समितीच्या दवाखान्यासाठी डाॅ. आयेशा राऊत यांनी मोफत औषधे दवाखाना प्रमुख सुरेश दाभाडे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी नवीद मुश्रीफ, जमीर नाईक, मुन्ना सर, आदी उपस्थित होते.

Web Title: Free clinic in Kagal