कोल्हापूर : कर्जासाठी खोटा शिक्का आणि सही करून केर्ली (ता. करवीर) ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याप्रकरणी बाप, लेकावर करवीर पोलिसात सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला. आनंदा बाबू मिरजकर, प्रदीप आनंदा मिरजकर (रा. केर्ली ) अशी त्या संशयितांची नावे आहेत.पोलिसांनी सांगितले की, जनविकास फायनान्सच्या कर्जासाठी आनंदा आणि प्रदीप यांनी केर्ली गावच्या हद्दीतील ७०८ ही मिळकत सीटी सर्व्हे झाली नसून तारण गहाणखत तयार करण्यास ग्रामपंचायतीची कोणतीही हरकत नसल्याच्या दाखल्यासाठी ग्रामपंचायतीचे बनावट लेटरहेड तयार केले. फिर्यादी विजयमाला बाबासाहेब चौगुले आणि ग्रामसेवक आशा ज्ञानोबा घुगे यांच्या नावाचाही खोटा शिक्का तयार केला. त्यावर चौगुले आणि ग्रामसेवक घुगे यांच्या खोटया सह्या करून तयार केलेला दाखला जनविकास फायनान्सच्या कर्ज प्रकरणासाठी जोडला. ग्रामपंचायतीची फसवणूक केली. यामुळे विजयमाला यांच्या फिर्यादीवरून आनंदा आणि प्रदीप यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
कोल्हापूर: कर्जासाठी खोटा शिक्का, सही करून केर्ली ग्रामपंचायतीची केली फसवणूक, बाप-लेकावर गुन्हा दाखल
By भीमगोंड देसाई | Updated: October 11, 2022 15:28 IST